दुसर्‍याची मान कापून स्वतःच राजकीय करिअर निर्माण करण्या ईतकी मी लेचीपिची नाही : मा.खा.प्रितमताई मुंडे

दुसर्‍याची मान कापून स्वतःच राजकीय करिअर निर्माण करण्या ईतकी मी लेचीपिची नाही : मा.खा.प्रितमताई मुंडे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) दुसर्‍याची मान कापून स्वत:च राजकीय करिअर निर्माण करण्या ईतपत मी लेचीपिची नाही.दुसर्‍याच्या नरड्यावर पाय देऊन आपल अस्तित्व निर्माण करणाऱ्यांतली मी नाही तर मी स्व. गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे असे मार्मिक उदगार बीडच्या माजी खासदार प्रितमताई मुंडे यांनी पाथर्डी येथे काढले.त्या विठोबाराजे मंगल कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होत्या.भारतीय जनता पक्षाने त्यांची नगर जिल्ह्य़ातील शेवगाव-पाथर्डी आणि बीड जिल्ह्य़ातील केज या दोन मतदारसंघात विधानसभा निवडणुक पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. तेव्हा त्यांनी दोन्ही तालुक्यातील निवडणुकीचा आढावा घेऊन वरिष्ठांपर्यंत अहवाल सादर केला आहे.या बैठकीचे रूपांतर नंतर जाहीर सभेत झाले.त्यावेळी निवडूंगे येथील शरद पवार आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून विरोधी पक्षाला जोरदार झटका दिला.आणि आमदार मोनिकाताई राजळे यांना निवडून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर माजी खासदार प्रितमताई मुंडे यांनी एक कविताच सादर करून उपस्थित श्रोत्यांकडून टाळ्या मिळवल्या, ती कविता अशी होती की “पाथर्डीत बाई आज घडला एक चमत्कार,मुंडेच्या हस्ते कमळवाशी, भाजपवाशी झाले शरदपवार.” या कवितेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली.कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून वांबोरी येथे प्राजक्तदादा तनपुरे यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.तेथेही याच कवितेची चर्चा सुरू होती.पाथर्डीतील सभेसाठी अभय आव्हाड, बाबा राजगुरू,धनंजय बडे,अशोक चोरमले,भगवान दराडे,मृत्युंजय गर्जे, बापूसाहेब पाटेकर, भगवान आव्हाड,सुरेश भागवत, रवींद्र आरोळे, महेश अंगारखे, गणेश रांधवणे, गणेश कराड, सचिन वायकर, उद्धवराव वाघ, रामकिसन काकडे, काशिबाई गोल्हार,मंगल कोकाटे,नारायण पालवे, सुभाष आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.पंकजाताई मुंडे यांना मंञी करण्यासाठीच आमदार राजळेंना निवडूण द्या असे आवाहन प्रभारी निरीक्षक प्रितमताई मुंडे यांनी केले.आणि कार्य कर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत प्रचंड जल्लोष केला.