शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात काकडे राजळे ढाकणे घुले चव्हाण यांच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात
(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील 222 शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील काकडे,राजळे,ढाकणे,घुले,चव्हाण या उमेदवारांकडून प्रचाराच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.भाजपच्या वतीने राष्ट्रीय नेते रावसाहेब दानवे,महसूल मंञी राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांकडून आमदार मोनिकाताई राजळे यांना नामदार करण्यासाठी तिसऱ्यांदा कमळावर बटन दाबून निवडूण द्या असे आवाहन करीत अमरापूर येथे शक्तिप्रदर्शन करीत जाहीर प्रचार सभा घेऊन प्रचारात आघाडीवर असल्याचे दाखवून देत हॅटट्रिकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांची शेवगाव येथे प्रतापराव ढाकणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेऊन त्यांनी ढाकणेंना तुतारी वाजवत विधानसभेत पाठवा आणि शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार निवडूण आणा असे आवाहन केले.अपक्ष उमेदवार सौ.हर्षदाताई काकडे यांनी आव्हाणे येथे गणपतीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला.संभाजीनगर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांनी जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील साखर सम्राट उमेदवारावर टीका करीत हर्षदाताई काकडे यांच्या रिक्षा या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करीत सभा गाजवली.अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी जुन्या नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधून सर्वांनाच किटलीतून चहा पाजून निवडणूकीत चांगलाच रंग भरला आहे. वंचित आघाडीचे उमेदवार किसनराव चव्हाण सर यांनी गॅस सिलेंडर घेऊन एकला चलोचा नारा देत मतदारसंघात घोंगडी बैठकीवर जोर दिलाआहे.बसपाचा हत्ती कुठे लपवून बसलाय तो अजून रस्त्यावर आला नाही.तर रासपच्या शिट्टीचा आवाज काही केले तरी वाजवत नाही.राजेंद्र ढाकणे या अपक्ष उमेदवाराने प्रतापराव ढाकणे यांना पाठींबा दिला आहे. तर ईतर काही अपक्ष उमेदवार आमदार मोनिकाताई राजळे यांच्या गटाला मिळणार असल्याची अंधारात चर्चा सुरूआहे.शह काटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. एकंदरीत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली जाणार असून ग्रामपंचायत निवडणुकी प्रमाणेच या निवडणूकीत रंग भरू लागला आहे.