चोपडा महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि.९ नोव्हेंबर २०२४ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागीय आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पावर लिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उदघाटन संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.डी.ए. सूर्यवंशी, जिमखाना विभाग समन्वयक प्रा.एम. जी. पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेश वाघ तसेच विविध महाविद्यालयातून आलेले डॉ.विजय पाटील, डॉ. शैलेश पाटील, श्री. मुकुंद शिरसाठ डॉ. सचिन पाटील, डॉ. वळवी सर इ. क्रीडा संचालक उपस्थित होते.त्यावेळी कुणाल गोयर, किशोर पाटील, पवन सोनवणे,सुधाकर बाविस्कर यांनी पंच म्हणून कार्य केले.
या स्पर्धेत एरंडोल विभागातील विविध महाविद्यालयातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयाचे (मुले व मुली) दोन्ही संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाले. तसेच एस.एस. बी.टी. इंजीनियरिंग महाविद्यालय भांबोरीचा संघ द्वितीय क्रमांकाने उपविजयी झाला. या स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आयोजन क्रीडा संचालक, डॉ. क्रांती क्षीरसागर यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अमोल पाटील, रवींद्र पाटील आणि सुधाकर बाविस्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.