जयमल्हार वाशिंग सेंटरच्या दुकानदाराचा खून तिसगावच्या उपसरपंचासह दोघे गजाआड, एक फरार ?

जयमल्हार वाशिंग सेंटरच्या दुकानदाराचा खून तिसगावच्या उपसरपंचासह दोघे गजाआड, एक फरार ?

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर/अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील जयमल्हार वाशिंग सेंटरच्या दुकानदाराचा खुन झाला असून तिसगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह दोघे गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून एक जण फरार झाला आहे.या बाबदची घटना अशी की तिसगाव येथील जयमल्हार वाशिंग सेंटरचे दुकानदार कल्याण देविदास मरकड वय (32) हे 1 नोव्हेंबर पासून गायब झाल्याची मिसिंग तक्रार क्रमांक 129/2024 प्रमाणे पाथर्डी पोलिसात प्रसाद मरकड यांनी दाखल केली होती.4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील नदीत कल्याण देविदास मरकड यांचा म्रुतदेह पोत्यात बांधून टाकलेल्या आवस्थेत मिळून आला.डोक्यात गोळी झाडून खून केल्याचा संशय नेवासा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना आला होता.पोलीसांनी सदर म्रुतदेह पोस्ट मार्टेमसाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला होता. नातेवाईकांच्या मागणीनुसार तो औरंगाबाद (संभाजीनगर) येथे पाठविण्यात आला.मयत कल्याण चा चुलतभाऊ प्रसाद भास्कर मरकड यांनी नेवासा पोलिस स्टेशन ला संशयित आरोपी म्हणून तिसगाव ग्रामपंचायतीचा उपसरपंच 1) पंकज राजेंद्र मगर वय(35), 2) ईर्शाद जब्बार शेख वय(38), 3)अमोल गोरक्षनाथ गारुडकर वय(33),सर्व राहणार तिसगाव ता.पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर,गावठी कट्टा पुरविणारा 4) सचिन रणशिंग, राहणार दत्ताचे शिंगवे ता.पाथर्डी ,जिल्हा अहिल्यानगर यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 1029/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103(1),238,भारतीय हत्यार कायदा कलम 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नेवासा पोलिसांनी उपसरपंचासह वरील तिघांना गजाआड केले आहे तर गावठीकट्टा पुरविणारा सचिन रणशिंग हा फरार असून त्यालाही लवकरात लवकर गजाआड करण्यात येईल असे नेवासा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले आहे.