सामनेर, लासगाव, आसनखेडा , माहिजी गावां मध्ये नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना वाढता पाठिंबा
निवडणुकीच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांचा झंजावात
*नानासाहेबांच्या विजयासाठी ग्रामीण भागातून मतदारांचा वाढता पाठिंबा*
पाचोरा (प्रतिनिधी)
आज दिनांक ८ नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी प्रचाराचा दौरा सामनेर, लासगाव, आसनखेडा, माहीजी या गावांना होता. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराची सुरुवात सामनेर येथील विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाने करण्यात आली. नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचाराचा झंजावात बघावयास मिळाला. यावेळी सामनेर लासगाव आसनखेडा माहेजी या गावातील स्थानिक कार्यकर्ते संजय अशोक, पाटील,सुनिल भिमराव पाटील,सुनिल प्रकाश पाटील,गणेश सुधाकर पाटील,पिंटू मोहन पाटील,सचिन भगवान पाटील, राहूल सुरेश,पाटील, चंद्रकांत पाटील,संदिप भालचंद्र पाटील, अरुण पाटील ,युवराज पाटील,फुलचंद बडगुजर ,शत्रुघ्न साळवे ,रमेश पाटील ,शंकर बोरसे, भावडू पाटील,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रचार रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी संपूर्ण गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती या प्रचार रॅलीतून दिसून आली. गल्लोगल्ली उस्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा दिसून आला. प्रसंगी नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची निशाणी सप्तकिरणांची पेनाची निप या चिन्हाचा प्रचार व प्रसार घरोघरी जाऊन संपूर्ण गावात करण्यात आला. यावेळी डॉ. पूनमताई पाटील यांचे घरोघरी औक्षण करण्यात आले. सामनेर लासगाव आसनखेडा माहीजी या गावातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघावयास मिळाला.