श्रीक्षेत्र मढी येथुन पायी दिंडी सोहळ्याचे गाणगापुर कडे प्रस्थान!
(थेट प्रक्षेपण सुनिल नजन “चिफ ब्युरो” अहिल्यानगर) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथील एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ संस्थान या संस्थेचे अध्यक्ष मुनिवर्य पोपट महाराज यांच्या मार्गदर्शना खाली
वडुलेखुर्द ते गाणगापुर या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान दि. 4 पासुन ते 16 नोव्हेंबर या कालावधीसाठी मढी मार्गे गाणगापुरच्या दिशेने सुरू झाले आहे. वडुलेखुर्द,मढी, चितळवाडी, सांगवी,पाटण,बेलगाव, आष्टी,जामखेड,राजूर, खर्डा,पाथरूड,बावी, भूम,नांदगाव, मलकापूर,येडशी, धाराशिव,वडगाव सिद्धेश्वर,तुळजापूर, मांजरा,इटकळ,हन्नुर, अक्कलकोट,मैंदर्गी, दुधनी,रेउर मार्गे गाणगापुर येथे16 नोव्हेंबर 2024 रोजी आगमन होईल.गिरणार प्रदक्षिणा पर्वणीकाळ आणि गाणगापुर येथील दत्त देवस्थान पादुका मादुकगीरी पर्वणी काळ या दोन्ही गोष्टीचे औचित्य साधून हा भव्य दिव्य पायी दिंडी सोहळा गाणगापुर येथील दत्त पादुकांच्या मिरवणूकीत सहभागी होणार आहे. गुरूवर्य पोपट महाराज यांच्या समवेत पवार महाराज, शिवाजी जाधव महाराज, अभिजित शिंदे महाराज, संदिप कर्डिले महाराज,डॉक्टर जगन्नाथ मरकड, कालिदास महाराज घोडके,अँडव्होकेट श्रीकांत टाकळीकर, दिगंबर खैरे पाटील, सागर मरकड आणि अनेक शिष्य गण सहभागी झाले आहेत.