भारतीय लोकशाही आघाडीची स्थापना !!!

भारतीय लोकशाही आघाडीची स्थापना!!!

 

नुकतेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्यासाठी जळगाव येथे जिल्हास्तरीय भारतीय लोकशाही आघाडीची स्थापना केली आहे.

पाचोरा येथिल आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता आयु.किशोर रमेश डोंगरे यांची

भारतीय लोकशाही आघाडीच्या जळगाव जिल्हा प्रवक्ता पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.त्याच धर्तीवर पाचोरा येथील समाज बांधवानी त्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये

बैठकीतचे आयोजन केले होते. समाज बांधवांच्या स्थानिक प्रश्नांना समोर ठरवून तालुकास्तरिय भारतीय लोकशाही आघाडीची स्थापना करण्यात आली.आंबेडकरी

समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्याकडे कोणी ही लक्ष देत नाहीत.निवडणुकीत आश्वासन दिले जाते.नंतर सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले जाते.यामुळे तालुक्यातील 25 हजारपेक्षा जास्त मतदान असणाऱ्या आंबेडकरी विचारांच्या लोकांना एकत्र करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

त्याचप्रमाणे अतिशय अल्पसंख्य असलेले इतर मागासवर्गीय समाज , आदिवासी , भटके विमुक्त , ओबीसी समाज यांना देखील एकत्र करून एक गठ्ठा मताची ताकद तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीच्या रीगणांत आसलेल्या प्रतिनिधीचे लक्षवेधले जानार आहेत.

अशा प्रकारच्या प्रश्नांवर जो उमेदवार न्याय देण्यासाठी ठोस भुमिका घेईल त्यास *भारतीय लोकशाही आघाडी जाहीरपणे पाठिंबा देणार आहे*.अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्यात येतील असा ही निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. प्रलंबित मुद्द्यावर तालुका संपर्क करुन प्रचार करण्यात येणार असून घराघरात संपर्क अभियान राबविण्यात जाणार आहे.

आज झालेल्या या बैठकीस पाचोरा व भडगाव तालुक्यातील तसेच शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील कामकाज बघण्यासाठी अरुण खरे, ज्ञानेश्वर सावळे,शेक ईमाम,शेक यासिन,रामजी जावरे,दगडू गायकवाड (मोची),दिलीप पवार (वडार)गैतम सपकाळे,विक्की ब्राम्हणे,जितू निकम,रुषीकेश पाटील,चंद्रकांत सोनवणे,प्रवीण सावळे,दिपक सातदिवे,शरद पवार,कैलास सोनवणे यांची कमिटी तयार करण्यात आली. पुढील प्रचार या कमिटीच्या नेतृत्वात केला जाणार आहे.

आंबेडकरी लोकांनी , समस्त बौद्ध ,मागासवर्गीय , आदिवासी , भटके विमुक्त , ओबीसी बांधवांनी या आघाडीत सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

आपला

ज्ञानेश्वर सावळे

भारतीय लोकशाही आघाडी.