शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात,काकडे, राजळे, घुले, चव्हाण,ढाकणे यांच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात
(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील 222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. भाजप व मित्र पक्षाच्या उमेदवार म्हणून आमदार मोनिकाताई राजळे यांनी शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र आव्हाने येथील निद्रिस्त गणपती मंदिरात आणि पाथर्डी शहरातील खोलेश्वर मंदिरात जाऊन आपल्या कमळ या निवडणूक चिन्हाच्या प्रचाराचा शुभारंभ केला.तर “रिक्षा” या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवार सौ.हर्षदाताई काकडे यांनीही याच गणपती मंदिरात नारळ फोडून आपल्या फौजफाट्यासह प्रचाराचा शुभारंभ केला.तर वंचित आघाडीचे उमेदवार किसनराव चव्हाण सर यांनीही सर्वात अगोदर याच गणपतीला पहिला मान देऊन आपल्या गॅस सिलेंडरच्या प्रचाराला सुरुवात केली.खुप प्रयत्न करूनही राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करून माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून” किटली ” या चिन्हाचा भाविनिमगाव येथील देवीच्या मंदिरात प्रचाराचा शुभारंभ केला.तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांनी आपल्यालाच अकोला या गावातून तुतारीच्या चिन्हाच्या प्रचाराचा शुभारंभ केला.या व्यतिरिक्त सुभाष साबळे,आत्माराम कुंडकर, एकनाथ सुसे,सुधाकर चोथे,युनुस शेख, रत्नाकर जावळे ,राजेंद्र ढाकणे,शिवहार काळे,सलमान बेग,संदिप शेलार हे उमेदवार ही आपले नशीब अजमावित आहेत. राजळे यांच्या प्रचारात अशोक चोरमले,मुकुंद गर्जे, अजय रक्ताटे,धनंजय बडे,रामनाथ बंग, अशोक गर्जे, प्रमोद भांडकर,अजय भंडारी,बाळासाहेब अकोलकर,भगवान आव्हाड, भगवान बांगर,अभय आव्हाड, उद्धवराव वाघ,रवींद्र आरोळे,सुरेश भागवत,रमेश गोरे,जगन्नाथ घुगरे,अशोक आमटे यांनी भाग घेतला,तर सौ.हर्षदाताई काकडे यांच्या प्रचारात जनशक्ती मंचचे महासचिव जगन्नाथ पाटील गावडे, साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ, अंतोन हिवाळे ,आनंद भंते, फटाले महाराज, काळे महाराज, बबन राठोड, प्रवीण ढाकणे,रामनाथ कवडे,प्रुथ्वीसींह काकडे,रमेश राठोड, आबासाहेब मोरे,भाऊसाहेब पिसे,हरिश्चंद्र काटे,राजकुमार हाके,उदय बुधवंत, विक्रम राठोड, संजय खेडकर, अमोल आव्हाड, नवनाथ सातपुते,गिन्याणदेव सुळ,हाके मेजर,मधुकर गोरे,शुभम चेके, अशोक ढाकणे,भाऊसाहेब पोटफोडे यांनी भाग घेतला. एकंदरीत सर्व प्रमुख नेत्यांकडून निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.