पाचोरा भडगाव विधानसभा निवडणुकीत नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची सकाळ सत्रात सातगाव डोंगरी, सार्वे, पिंपरी येथे प्रचारात आघाडी
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा भडगाव विधानसभा निवडणुकीची प्रचार फेरी चांगलीच रंगतदार सुरू झालेली असून त्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड या गणातील सातगाव डोंगरी, सार्वे, पिंपरी या ठिकाणी निवडणूक प्रचार रॅलीने आघाडी घेतली असून त्यांच्या रॅलीची सर्व दूर चर्चा होत आहे आज दिनांक 6 नोव्हेंबर वार बुधवार रोजी सकाळी सातगाव या गावातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ परमेश्वर पाटील स्थानिक कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते नारळ फोडून प्रचार रॅलीला सुरुवात झाली या प्रचार रॅलीत संदीप पाटील, भगवान पाटील, फिरोज पठाण, भीला पाटील, अर्जुन पाटील, विष्णू पाटील या स्थानिक मतदारांनी प्रचार रॅलीत सहभाग घेतला या प्रचार रॅलीत स्वराज्य पक्षाचे चिन्ह सप्त किरणातील पेनाची निप हे घरोघरी पोहोचून मतदारांचे आशीर्वाद घेण्यात आले या या रॅलीसाठी उत्तम असा प्रतिसाद लाभला त्यानंतर ही प्रचार रॅली सार्वे या गावातून घेण्यात आली या ठिकाणी आबा पाटील, स्वप्निल पाटील, शरीफ पठाण, पांडुरंग पाटील, भगवान पाटील, हर्षल पाटील या स्थानिक मतदारांनी घरोघरी जाऊन प्रचार व प्रसार करण्यास मदत केली त्यानंतर पिंपरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरात महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर या रॅलीमध्ये पिंपरी चे सरपंच अमोल बाविस्कर, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर मिस्त्री, राजेंद्र पाटील, सुनील धोबी इत्यादी कार्यकर्त्यांनी सुद्धा समावेश घेतला व पिंपरी येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला शिंदाड गणामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळाल्याने स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रताप हरी पाटील यांना विजयी करून आणण्याचे मतदारांनी घोषित केले