वैशालीताई सुर्यवंशी या स्वाभिमानाचे प्रतिक ! – रोहित पवार
भडगाव येथील सभेला उदंड प्रतिसाद : महाविकास आघाडीच्या एकतेची वज्रमूठ
भडगाव दिनांक ६ नोव्हेंबर प्रतिनिधी । वैशालीताई सुर्यवंशी या स्वाभीमानाचे प्रतिक असून आगामी निवडणूकीत जनता त्यांना नक्कीच विजयी करणार असे नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ते वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते.
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी जोरदार जयघोषात रोहित पवार यांचे स्वागत करण्यात आले. वैशालीताई सुर्यवंशी आपल्या मनोगतात म्हणाल्या की, पाचोरा भडगाव मतदार संघात विकासाच्या नावाखाली लूट केली जात आहे. कमिशन व टक्केवारीच्या नावाखाली मतदार भरडला जात आहे. आज मतदार संघात गुंडगिरी आणि दहशत वाढल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विकासाच्या नावाखाली मतदार संघाचा चेहरा भकास झाला असून आता गद्दारीचा कलंक देखील या मतदारसंघाला लागला आहे. मतदार संघातील मोठमोठ्या शहरांमध्ये १०-१० दिवस पाणीपुरवठा होत नाही. दुसरीकडे पिकाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी ओरडतोय, तर तरूणांना नोकरी नसल्याने ते व्यसनाधित होत आहे. असे असतांना निवडणूक लागल्यावर विरोधक फक्त एमआयडीसी आणून तरूणांना रोजगार देण्याचे गाजर दाखविण्याचे काम करत आहे. शिवाय आतातर जातीपातीचं विष या मतदार संघात पेरलं जात आहे. आता मतदार संघ हा जागरूक झाला असून त्यांना आता बदल हवा आहे. असे सांगून वैशालीताई सुर्यवंशी यांनी विरोधकांवर सडकून टिका केली आहे.
यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या मनोगतातून जोरदार हल्लाबोल करत महाविकास आघाडीला कौल देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, पाचोरा आणि भडगाव मतदार संघात वातावरण कसं आहे हे पाहण्यासाठी फिरत असतांना कार्यकत्यांशी चर्चा केली, लोकांना भेटलो, बोललो आणि चर्चा केली. एका ठिकाणी चहा पित असतांना सामान्य व्यक्तीने मतदार संघाबद्दल सुंदर माहिती सांगितली. या मतदार संघात शेतकरी हे स्वाभिमानी आहेत, कष्ट करून स्वाभीमानाने जगतात. या मतदार संघात निवडणूकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांकडे बघितल्यानंतर वैशालीताई सुर्यवंशी ह्या स्वाभीमानाचं आणि निष्टेचं प्रतिक आहेत. या मतदारसंघात वैशालीताईंच्या विरोधात उभे असलेले तिघेही उमेदवारांनी पक्षामध्ये गद्दारी केली आहे. हे सर्वसामान्य माणसाला कळतय. जेव्हा इलेक्शन सर्व सामान्य माणूस हातात घेतो, त्यावेळी पैशांवाल्यांचा माज उतरतो. निर्मल सिडसचे देशासाठी मोठे योगदान ठरत आहे. अगदी कानाकोपऱ्यापर्यंत निर्मल सिडस मुळे पाचोरा भडगाव मतदार संघाचे नाव निघत आहे. या मतदार संघाच्या निवडणूकीसाठी वैशालीताई सुर्यवंशी ह्या एकमेव महिला उमेदवार असून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन करण सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
याप्रसंगी व्यासपीठावर रोहितदादा पवार, करण पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रमोद बापू पाटील, ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील, एजाज मलिक, डॉ. संजीव पाटील, कमलताई पाटील, सुनील पाटील, सुधाकर वाघ, अँड. अभय पाटील, शरद पाटील, राज साळवी, सुमन साळवी, दिपक राजपूत, गणेश परदेशी, योजनाताई पाटील, पुष्पाताई परदेशी, रामकृष्ण पाटील, मच्छिंद्र पाटील, श्याम महाजन, राजेंद्र मोरे, अरुण सोनवणे, लक्ष्मीताई पाटील, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, मनोहर चौधरी, शंकर मारवाडी, रमेश बाफना, उद्धव मराठे, अर्जुन बाग, राजू देशमुख, इसाक मलिक, भिकनुर पठाण, सुभाष पाटील, प्रशांत पवार, रतन परदेशी, दत्तूभाऊ मांडोळे, कादर बेग मिर्झा, याकूब दादा पठाण, दिपक पाटील, जे. के. पाटील, दिलीप शेंडे, कमर दादा पठाण, शामिर पठाण, रमेश भदाणे, सुनील गोकल, हरिभाऊ पाटील, भाऊसाहेब पाटील, दिपक पाटील, विजय साळुंखे, राजू मोरे, अँड. मोहसिन शेख, सलमान मिर्झा, पृथ्वीराज पाटील, प्रवीण पाटील, गोरख पाटील, माधव जगताप, राजेंद्र राजपूत, चेतन रविंद्र पाटील, चेतन रंगनाथ पाटील, भैय्या राजपूत, नवल राजपूत, सत्यजित पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तर या सभेला शिवसेना-उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.