चित्रकार शैलेश कुलकर्णी यांच्या “अंतरंग” चित्रप्रदर्शनाचे जळगाव येथे उदघाटन

चित्रकार शैलेश कुलकर्णी यांच्या “अंतरंग” चित्रप्रदर्शनाचे जळगाव येथे उदघाटन

 

 

दिनांक. ५ नोव्हेंबर २०२४

पाचोरा येथील चित्रकार कलाशिक्षक – शैलेश कुलकर्णी यांच्या ” अंतरंग ” या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन नुकतेच दिनांक. ५ नोव्हेंबर रोजी पू.ना.गाडगीळ अँड सन्स.ली. जळगाव येथे मा.श्री. एस. डी.भिरुड सर, राज्य चिटणीस ,अखिल महाराष्ट्र राज्य कला शैक्षणिक संघ यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. विशेष निमंत्रित म्हणून सुप्रसिध्द चित्रकार – लेखक राजू बाविस्कर सर, विशेष उपस्थिती म्हणून ज्येष्ठ सेवानिवृत्त कलाशिक्षक एल.झेड.कोल्हे सर तसेच कलाशिक्षक डी.आर.कोळी सर, कलशिक्षक अरुण सपकाळे सर – सचिव जळगाव कलाध्यापक संघ ,प्राचार्य संदीप पाटील सर,कलाशिक्षक नंदू पाटील, तरसोद येथील मुख्याध्यापक मिलिंद कोल्हे सर, डॉ.सुभाष महाले सर संस्कार भारती अध्यक्ष जळगाव , नेहा देशमुख खेळाडू – भारतीय सॉफ्टबॉल संघ , मा.श्री संदीप पोतदार सर व्यवस्थापक पू ना गाडगीळ अँड सन्स ली. जळगाव, अर्चना शेलार तसेच कलारसिक,विद्यार्थी व कलाशिक्षक
इ. उपस्थित होते. या प्रसंगी राजू बाविस्कर सर , एल झेड कोल्हे सर, डी.आर.कोळी सर यांनी प्रदर्शनाबद्दल आपले मनोगत तसेच मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तेजल देव यांनी केले.
*”अंतरंग” चित्रप्रदर्शन दिनांक. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२४* या कालावधीत *पू.ना.गाडगीळ अँड सन्स. ली., रिंग रोड, बहिणाबाई गार्डन जवळ, जळगाव येथे सकाळी ११ ते ८ या वेळेत सुरू राहील.*
या चित्रप्रदर्शनात चित्रकार शैलेश कुलकर्णी यांनी विविधतेने नटलेला सभोवतालचा सुंदर निसर्ग आपल्या कुंचल्यातून मांडलेला आहे.
तरी जास्तीत कलारासिकांनी या चित्रप्रदर्शनास भेट द्यावी , असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
प्रदर्शनाच्या उदघाटन यशस्वीतेसाठी सत्यजित पाटील , किर्तिकुमार सोनवणे, साई कोळी, वैष्णवी पाटील,प्रणव कोळी,उन्नती पाटील , दुर्वास रोडले ई. नी विशेष परिश्रम घेतले.