बळीराजाच्या राज्यासाठी परिवर्तनाची आवश्यकता : वैशालीताई सुर्यवंशी
महाविकास आघाडीच्या वतीने बळीराजाचे पूजन
पाचोरा, दिनांक ३ ( प्रतिनिधी) : आज जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा विपन्नावस्थेत आहे. ही स्थिती बदलून खऱ्या अर्थाने बळीराजाचे राज्य हवे असेल तर विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना खाली खेचून परिवर्तन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पाचोरा-भडगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या बळीराजा पुजनाच्या प्रसंगी बोलत होत्या.
बली प्रतिपदेच्या दिवशी शिवसेना-उबाठा पक्षाच्या शिवालय या कार्यालयात बळीराजा पूजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. याप्रसंगी बळीराजाच्या प्रतिमेला माल्यार्पण, पूजन व वंदन करून जोरदार जयघोष करण्यात आला. याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंदुत्व हे बहुजनांच्या हिताचे हिंदुत्व आहे. बळीराजा हे आपल्या सर्वांचे दैवत आहे. आम्ही स्वत: पहिल्यापासून कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत असून उध्दव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताचा विचार घेऊन आगेकूच करत आहोत. शेतकऱ्यांना सुख समृध्दी मिळावी अशी प्रार्थना आम्ही केली आहे. तर राज्यातील शेतकरी विरोधी सरकार हटवून तेथे बळीराजाच्या हिताची काळजी घेणारे महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ व्हावे असे साकडे देखील आम्ही टाकले आहे. तर राज्यासह पाचोऱ्यातील जनता देखील परिवर्तनाच्या बाजूने कौल देणार असा आशावाद देखील वैशालीताई सुर्यवंशी यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला रमेश बाफना, उध्दव मराठे, अरूण पाटील, अभय पाटील, शरद पाटील, अनिल सावंत, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, पप्पू जाधव, दादाभाऊ चौधरी, अभिषेक खंडेलवाल, खंडू सोनवणे, हेमराज राठोड, प्यारेलाल, दिपक राजपूत, हरीश देवरे, मनोज चौधरी, बंटी हटकर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती