महाराष्ट्राचे कुमार व मुली खो-खो संघ जाहीर

महाराष्ट्राचे कुमार व मुली खो-खो संघ जाहीर

 

अलीगड, उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार, स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर मुंबईत

 

धाराशिव, दि.१ नोव्हेंबर-

 

अलीगड, उत्तरप्रदेश येथे २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ४३व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी जाहीर केले.

 

धाराशिव येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून हे संघ प्रशांत कदम (सातारा), गोविंद शर्मा (छत्रपती संभाजीनगर), संदीप चव्हाण (पुणे) व भावना पडवेकर (ठाणे) या निवड समिती सदस्यांनी निवडले. या संघात धाराशिवबरोबरच सांगली, सोलापूर, ठाणे, पुणे, अहिल्यानगर, सातारा, नाशिक, मुंबई उपनगर,रत्नागिरी, जालना या जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर १७ नोव्हेंबरपासून ओम साईश्वर मंडळ, मुंबई येथे होणार आहे.

 

महाराष्ट्राचे संघ असे : कुमार गट : वळवी सोत्या, वळवी विलास, वळवी भरत, जाधव राज, वसावे जितेंद्र (धाराशिव), बनसोडे प्रज्वल, दळवी प्रेम, देवकाते पार्थ (सांगली), बनसोडे कृष्णा, चव्हाण शुभम ( सोलापूर), गौतम आशिष (ठाणे), गुंडगळ चेतन, माशिरे भावेश (पुणे), वाल्हेकर अनय (अहिल्यानगर), जगताप प्रतिक (सातारा), प्रशिक्षक : युवराज जाधव (सांगली),

 

मुली गट : शिंदे अश्विनी, भोसले तन्वी, धोत्रे सुहानी, काळे प्रणाली (धाराशिव), चाफे सानिका, बिराजदार प्रतीक्षा, तामखडे धनश्री (सांगली), बनसोडे प्राजक्ता, लामकाने स्नेहा (सोलापूर), काटेकर दीक्षा, कंक धनश्री (ठाणे), चौधरी सुषमा (नाशिक), गायकवाड दिव्या (मुं. उपनगर), चव्हाण रिद्धी (रत्नागिरी), शेख जोया (जालना), प्रशिक्षक : श्रीकांत गायकवाड (मुंबई), व्यवस्थापिका सुप्रिया गाढवे (धाराशिव).

———–