ऐतिहासिक देखाव्यात वाजत गाजत आमदार प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी विधानसभेसाठी उमेदवारीअर्ज दाखल

ऐतिहासिक देखाव्यात वाजत गाजत आमदार प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी विधानसभेसाठी उमेदवारीअर्ज दाखल

 

(सुनिल नजन /चिफब्युरो/अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ऐतिहासिक देखाव्यात वाजत गाजत राहुरीत मामांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांकडून या उमेदवारीचे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत समर्थन करण्यात आले.स्वर्गीय बाबुराव तनपुरे यांच्या बाजार समितीतील पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांची ऐतिहासिक देखाव्यात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आमदार सौभाग्यवती सोनालीताई तनपुरे यांनी महिलांची फौज तयार करून या मिरवणुकीचे नेतृत्व केले होते. या मिरवणुकी नंतर जाहीर सभेतील व्यासपीठावर करंजीचे रफिकभैय्या शेख ,गोविंद मोकाटे,प्रशांत म्हसे,राहुल बहिरट,प्रकाश देठे,किसन झिने, यांच्यासह अनेकांची भाषणे झाली.जयंत पाटील यांनी यावेळेस प्राजक्त तनपुरे यांना पुन्हा आमदार करा कॅबिनेटचे मी पाहिल असे आश्वासन दिल्यानंतर उपस्थित श्रोत्यांकडून टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार प्रसादराव तनपुरे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा योगिताताई राजळे,पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,अरूण तनपुरे,चाचा तनपुरे,उषाताई तनपुरे,उषाताई कराळे, संभाजीराव तनपुरे,युवानेते अमोल वाघ,बाबासाहेब भिटे,महादेव अकोलकर, विक्रम गाडे,नंदकुमार गागरे,कुंडलिक डौले,देविदास वाघ,विकास पडघलमल,सुनिल लवांडे,संजयपाटील लवांडे,जालिंदर वामन, विजय तमनर हे आवर्जून उपस्थित होते.खासदार निलेश लंके यांचे शेवटी आगमन होताच जल्लोष करण्यात आला.लंके यांनी सांगितले की समोरच्या उमेदवाराची ही शेवटची लढाई आहे आता त्यांना कायमचेच घरी बसवा. ईमामपुर घाटाच्यावर, आणि करंजीघाटाच्या खाली मी पाहतो तुम्ही फक्त राहुरी सांभाळून ठेवा कसा विजय होत नाही तेच मी पाहतो.तुतारी आणि झांज पथकाच्या गजरातील ऐतिहासिक मिरवणुकीने शिवछञपतींच्या राज्यभिषेकाची आठवण होऊन राहुरीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.