नेवासाफाटा येथे महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील नेवासाफाटा येथे लक्ष्मी मंगल कार्यालयात महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. नेवासा येथील ही जागा महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाला सोडली तरी सर्व घटक पक्षातील सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविणार असल्याचे सर्व नेत्यांनी सांगितले.या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे होते. भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे,आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेवाशाचे नेते अब्दुलभाई शेख या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी सर्वांनी एकदिलाने काम करणार असल्याचे सर्वांनीच सांगितलें. उपस्थित सर्व प्रमुख नेत्यांकडून विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्याविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत या मेळाव्यात जोरदार टीका केली. कोणालाही तिकीट मिळाले तरी ही जागा कोणत्याही परिस्थितीत आपण जिंकून आणू शकतो असा विश्वास सर्व नेत्यांनी दिला. या वेळी युवानेते ॠषिकेश शेटे यांनी असे सांगितले की विरोधकांनी कोणी खोटी केसकेली तर मी त्या व्यक्तीसाठी मोफत वकील देणार असल्याचे सांगितले.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अब्दुलभाई शेख हे म्हणाले की ही जागा जरी अजित पवार गटाला सुटली तरीही मी मोठ्या ताकदीनिशी ही निवडणूक लढायला तयार आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले पाच वर्षांत फक्त चार वेळा विधान सभेत बोलणारा माणूस आपल्याला नको आहे.तर लोकांचे प्रश्न विधान सभेत विचारून उपस्थित जनतेला न्याय मिळवून देणारा आमदार हवा आहे.देविदास साळुंके,अमरदिप शेरकर, भाऊसाहेब फुलारी,ज्ञानेश्वर भिटे,सुभाष पवार,सुनील वाघमारे,दिलीप पवार,अंकुश काळे, महेश शिंदे,विलास देशमुख, नामदेव खंडागळे गुरूजी,माउली शेटे,भाऊसाहेब वाघ, विश्वास काळे, प्रताप चिलटे,कैलास दहातोंडे,बाबाजी कांगुणे,आशाताई मुरकुटे,तेजश्री लंघे,मंगल काळे,राजूमामा तागड, अशोक कोळेकर,यांच्यासह भाजप, (शिंदेगट) शिवसेना,(अजितपवार) राष्ट्रवादी, (आठवलेगट)रिपब्लिकन, रयत क्रांती या महायुतीच्या सर्व घटक पक्षातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यकर्ते वज्रमूठ बांधून ही निवडणूक मोठ्याताकदीने लढविणार असल्याचे दिसून आले. आमदार गडाख यांच्याविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत हा मेळावा घेण्यात आला.आ.गडाख आता या निवडणूकीत निवडून येण्यासाठी कोणती खेळी करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.