के सी ई इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या एमबीए विद्यार्थ्यांनी निरीक्षणगृहातील मुला मुलींसोबत साजरा केला दीप पर्व महोत्सव

के सी ई इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या एमबीए विद्यार्थ्यांनी निरीक्षणगृहातील मुला मुलींसोबत साजरा केला दीप पर्व महोत्सव

 

 

के सी ई इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट महाविद्यालयातील एमबीए विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने दिनांक 26 ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य चौक, जळगाव येथील गव्हर्नमेंट निरीक्षणगृहातील मुला मुलीं साठी दीप पर्व महोत्सवाचे आयोजन केले. यामध्ये प्रामुख्याने दिवा पेंटिंग आणि दिवा स्टॅन्ड मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. सगळ्या मुला मुलींनी खूप सुंदर रित्या दिवा पेंटिंग केले. सगळ्या मुला मुलींना पारितोषिके देण्यात आली तसेच फळे, मिठाई आणि फटाके वाटप करण्यात आले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिथल्या मुला मुलींसोबत मनोरंजन पूर्वक गायन नृत्य सादर केले व फटाके फोडून दिवाळी साजरी केली. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. या कार्यक्रमाचे आयोजन एमबीए फिनटेक विभाग प्रमुख प्रा. शेफाली अग्रवाल यांनी केले. त्यांना प्रा. हर्षा देशमुख, प्रा. हेमंत धनंधरे, प्रा. दिगंबर सोनवणे, प्रा. कोमल जैन प्रा. तानिया भाटिया, प्रा. रेवती पाटील प्रा. देवेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.