सुवर्णमहोत्सवी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा 

सुवर्णमहोत्सवी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

सुवर्णमहोत्सवी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद

व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिवमध्ये

 

मुंबई, (क्रि. प्र.), २१ ऑक्टोबर. : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची २०२४-२५ वर्षातील सुवर्णमहोत्सवी (५० वी) कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनच्या यजमान पदाखाली धाराशिव (उस्मानाबाद) येथे आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी के;ली. या स्पर्धतून उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या ४३ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे.

 

सुवर्णमहोत्सवी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिव (उस्मानाबाद) येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या निरज गॅस एजन्सीजवळील मैदानावर २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत रंगणार आहे.

 

या स्पर्धेसाठी २१ नोव्हेंबर २००६ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेले १८ वर्षांखालील कुमार-मुलींचे २४ जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५;३० वाजता स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडणार असल्याचे राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांनी जाहीर केले. तसेच सर्व संघांना वेळेवर उपस्तीत राहण्याचे सुध्दा कळविले आहे.

 

दरम्यान, राज्य खो खो संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. स्पर्धेसाठी मैदाने, गॅलरी यांची उभारणी करण्यात येत आहे.

 

या स्पर्धेसाठी गटवारी पुढील प्रमाणे आहे.

किशोर गट : अ-गट: सोलापूर, पालघर, जालना; ब-गट: पुणे, परभणी, बीड; क-गट: धाराशिव, रायगड, सिंधुदुर्ग; ड-गट: सांगली, सातारा, जळगाव; इ-गट: नाशिक, नंदुरबार, हिंगोली; फ-गट: मुंबई, रत्नागिरी, लातूर; ग-गट: ठाणे, धुळे, हिंगोली, छ. संभाजी नगर; ह-गट: मुंबई उपनगर, अहमदनगर, नांदेड.

 

किशोरी गट : अ-गट: धाराशिव, सातारा, परभणी; ब-गट: नाशिक, छ. संभाजी नगर, नंदुरबार; क-गट: सांगली, धुळे, सिंधुदुर्ग; ड-गट: ठाणे, जालना, हिंगोली; इ-गट: मुंबई उपनगर, लातूर, रायगड; फ-गट: पुणे, पालघर, जळगाव; ग-गट: सोलापूर, अहमदनगर, बीड; ह-गट: रत्नागिरी, मुंबई, नांदेड.