श्री. गो.से हायस्कूल पाचोरा येथे दी.15 ऑक्टोबर रोजी जागतिक वाचन प्रेरणा दिवस व जागतिक हात धुवा दिवस यशस्वी पद्धतीने साजरा करण्यात आला

श्री. गो.से हायस्कूल पाचोरा येथे दी.15 ऑक्टोबर रोजी जागतिक वाचन प्रेरणा दिवस व जागतिक हात धुवा दिवस यशस्वी पद्धतीने साजरा करण्यात आला

 

माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वाचनाचे मानवी जीवनातले महत्त्व समजावून सांगण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय ग्रंथालयातील विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक पुस्तकांचे वाटप करून त्यांचे वाचन करून घेण्यात आले.

जागतिक स्वच्छता दिवस निमित्त विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगण्यात आले व स्वच्छ हात कसा धुवायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन.आर. ठाकरे सर उपमुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील सर,पर्यवेक्षक श्री. ए.बी.अहिरे सर, सौ.ए. आर.गोहील मॅडम शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.