पाटणादेवी सार्वजनिक वाचनालय येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा

पाटणादेवी सार्वजनिक वाचनालय येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा..

 

भडगाव – देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म व वाचन प्रेरणा दिवस चाळीसगाव येथील पाटणादेवी सार्वजनिक वाचनालय तर्फे साजरा करण्यात आला.

त्यांचे मौलिक पुस्तके वाचनालयात वाचकासाठी उपलब्ध करून देण्यात आली.

वाचन संस्कृतीसाठी वर्ग ग्रंथालय उपक्रम वाचन प्रेरणा दिन विशेष अभियान संकल्पना शालेय जीवनात परीक्षा पद्धतीत बदलांमुळे मुले वाचन करीत नाहीत,वाचन संस्कृती टिकून राहावी,यासाठी ‘वर्ग ग्रंथालय अभियान योजना सुरू केली आहे.

सदर कार्यक्रमास प्रसंगी प्रतिमा पूजन आदरणीय गुलाबराव साळुंखे यांनी केले वाचनालयाचे उपाध्यक्ष मयूर साळुंखे,गणेश पवार ,निर्भय पाटील, प्रतीक मोरे,जयेश बोरसे,शुभम शेवरे, पियुष बागुल आदी उपस्थित होत.