उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडून प्रकाश तेली यांची प्रशंसा

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडून प्रकाश तेली यांची प्रशंसा

 

 

जळगांव:- कवी, लेखक, पत्रकार व गीतकार प्रकाश तेली यांच्या शिक्षा की महत्ता  ह्या काव्यसंग्रहाचे महराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शुभेच्या पत्राद्वारे प्रशंसा केली आहे.  

काय म्हटले आहे चंद्रकांत दादा पाटील यांच्या पत्रात:- शिक्षा की महत्ता (शिक्षणाचे महत्व) हा काव्यसंग्रह वाचून खूप आनंद झाला. प्रकाश तेलीजीं नी आपल्या लेखनातून शिक्षणाचे महत्त्व आणि गरज अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. त्यांची लेखनशैली त्यांची ओळख तर दर्शवतेचपण वाचकांनाही खोलवर स्पर्श करते. या संग्रहात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे कीशिक्षणाची संपत्ती अमूल्य आहेहा असा खजिना आहे ज्यामध्ये इतर कोणाचाही वाटा नसतो.

              हा काव्यसंग्रह इतर सर्वांपेक्षा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिक्षण हे जीवन कसे समृद्ध बनवते याचे अतिशय सर्जनशील पद्धतीने चित्रण या काव्य संग्रहात करण्यात आले आहे. “शिक्षणाचे महत्त्व” या कविता समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहेत आणि शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध मोहिमांसाठीही हा काव्य संग्रह अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

             प्रकाश तेलीजीं च्या कविताघोषवाक्य आणि अवतरणे अतिशय सोप्या आणि प्रभावी आहेतज्या सर्वांना सहज समजू शकतात. त्यांची साधीस्पष्ट आणि हृदयाला भिडणारी लेखनशैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. साहित्य क्षेत्रात ते करत असलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

प्रकाश तेली यांचा परिचय :- प्रकाश तेली हे कवी, लेखक, पत्रकार व गीतकार असून असून त्यांनी 5000 कविता व 7000 घोषवाक्य हे लिहिलेले असून लवकरच पेड़ की महत्ता (झाडाचे महत्व) हा काव्य संग्रह प्रकाशित होणार आहे. अनेक काव्य संग्रहासोबत अन्य साहित्य त्यांचे भविष्यात प्रसिद्द होणार आहे.