आगामी निवडणुकीत आपला विजय निश्चीत ! : वैशालीताई सुर्यवंशी

आगामी निवडणुकीत आपला विजय निश्चीत ! : वैशालीताई सुर्यवंशी

नगरदेवळ्यात शिवसेना-उबाठा पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन

 

नगरदेवळा, ता. पाचोरा, दिनांक ११ (प्रतिनिधी ) : येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी झटून कामाला लागावे, यात आपलाच विजय होणार आहे ! असे प्रतिपादन वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या पक्षाच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या.

 

आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या सुविधेसाठी शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने महत्वाच्या गावांमध्ये संपर्क कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. यात नगरदेवळा येथे देखील पेठ भागात पक्षाचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून याचे वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अचूक नियोजन करून मेहनत करावी, आपला विजय नक्कीच होणार आहे ! असे प्रतिपादन याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी करत आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

 

 

या कार्यक्रमाला माजी उपसरपंच पांडुरंग भामरे, सुरेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य विनोद परदेशी, विकासो सदस्य गबा परदेशी, विठ्ठल चौधरी, राजू चौधरी, राजेंद्र देवरे, राजू पाटील, असलम बेग, कालूदादा, रफीकदादा, अ न्नुभाई, शांताराम सर, योगेश सराटे, दत्तूभाई, विकी जाधव, मुकेश राजपूत, जितूशेठ, श्रीकृष्ण पाटील, अशोकबापू, आनंदा पाटील, सागर देवरे, राजेंद्र देवरे, बबलू पाटील आदी मान्यवरांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.