शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचे ही जीवनात महत्त्वाचे स्थान- उपप्राचार्य प्रा.डॉ. के.एन. सोनवणे

शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचे ही जीवनात महत्त्वाचे स्थान- उपप्राचार्य प्रा.डॉ. के.एन. सोनवणे

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. संदीप बी. देवरे यांनी कामाच्या ठिकाणी आपले मानसिक आरोग्य कसे संतुलित ठेवावे तसेच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी उपचार व उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक पी. एस. पाडवी उपस्थित होते

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर.आर. पाटील यांनी केले.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी चांगले मानसिक आरोग्य जोपासण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, योगा, ध्यानधारणा यांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी माया शिंदे, एस.टी. शिंदे, संदीप बी. पाटील, प्रमोद पाटील, व्हि.डी. शिंदे, दीपक करंकाळ, अभिजीत पाटील, निवृत्ती पाटील, भूषण बिरारी, बाबासाहेब जाधव, दिनेश आलम यांच्यासह शिक्षक बंधु-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रगती चव्हाण यांनी तर आभार कु. प्राजक्ता गुरव यांनी मानलेत.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.