श्री.गो.से. हायस्कूल येथे तालुकास्तरीय स्काऊट-गाईड संघनायक प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

श्री.गो.से. हायस्कूल येथे तालुकास्तरीय स्काऊट-गाईड संघनायक प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि.9 ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय स्काऊट गाईड संघनायक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या या शिबिरास स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक श्रीमती हेमा वानखेडे मॅडम, पाचोराच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरोज गायकवाड मॅडम, भातखंडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.अभिजीत खैरनार सर, नगरदेवळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. मोराणकर सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन. आर.ठाकरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास श्री.जी.यु. पवार सर,नगरदेवळा व श्री. सोनवणे सर गिरड हायस्कूल हे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर,उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील सर व पर्यवेक्षिका सौ.ए.आर.गोहिल मॅडम यांच्या हस्ते वरील सर्व मान्यवरांचा शाल व बुके देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला.

. . स्काऊट गाईड चे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

….. आपल्या प्रास्ताविक भाषणातून शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरोज गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थी व शालेय जीवनात स्काऊट-गाईडचे असलेले महत्त्व अधोरेखित केले.

.. . या शिबिरात स्काऊट गाईड ची प्रार्थना, झेंडा गीत, ध्वजारोहण पद्धत, गाठीचे प्रकार, स्काऊट गाईडच्या टाळ्यांचे विविध प्रकार, स्काऊट गाईडचे खेळ, बी.पी. व्यायाम, शेटीच्या खुणा, स्काऊट गाईडचे कर्तव्य,वचन, नियम यासारखे विविध उपक्रम सकाळी 9:30 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत राबवण्यात आले.

. गो.से. हायस्कूलचे स्काऊट गाईड प्रमुख श्री.आर.बी कोळी सर, गाईड कॅप्टन सौ.एम. आर. सोमवंशी मॅडम, सौ.एस.पी. सूर्यवंशी मॅडम व तालुकाभरातून विविध शाळांचे स्काऊट गाईड प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट मास्तर श्री.एम.आर. पाटील सर यांनी केले.