“माँ दुर्गा मी रूप तुझं” या संदेशावर श्री. गो से.हायस्कूलमध्ये फलक सजावट

“माँ दुर्गा मी रूप तुझं” या संदेशावर श्री. गो से.हायस्कूलमध्ये फलक सजावट

 

 

शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह.आपण मुलगी ही देवीच रूप म्हणतो.

 

सध्या महिलांवर ,लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक नवनवीन घटना समोर येत आहेत. आधी कोलकत्ता आणि बदलापूर प्रकरणी देशात संतापाची लाट पाहायला मिळाली आहे. दोन दिवसापूर्वीच पुण्यातील घटना या सर्व घटना बघता आता लहान मुली व महिलांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भीती निघायला हवीच.यासाठी महिला वर्ग आपल्यासोबत काही सेफ्टी वस्तूंचा टिप्सचा वापर करून आपल्यातील भीतीवर मात करू शकतात आणि आत्मविश्वासाने घराबाहेर पडू शकतात.

 

सद्यस्थितीवर आधारित श्री गो.से.हायस्कूल पाचोरा येथील कलाशिक्षक सुबोध कांतायन सर यांनी शाळेच्या दर्शनी भिंतीवरील फलकावर माँ दुर्गा चे रंगीत खडूने केलेले सुबक चित्र रेखाटले आहे.सोबतच लहान मुलगी देवींची मूर्तीच निरीक्षण करताना आपल्याला ती देवीच्या स्वरूपातच दिसून येते.देवी सारखेच मी सुद्धा दुष्कृत्य करणाऱ्यांचा नायनाट करेल जणू ते हे सांगतेच आहे.देवीच्या चेहऱ्यावरील उजळ रंगछटा, आभुषणांवरील नाजूक अलंकरण, विविध रंगछटेतून निर्माण झालेली केशरचना, डोळ्यातील जिवंतपणा चित्रात जाणवतो. पण प्रत्यक्ष चित्र बघितल्यावर बघणारे सांगतात की , विचारांनी थैमान घातलेले मन, चित्र दर्शनाने शांत होते अन देवीच रूप बघून मन आनंदित होते . फक्त मनापासुन चित्राचाआस्वाद घेता आला पाहिजे. शाळेतील प्रत्येक घटकाच्या व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील चित्र बघतानाचा आनंद बघुन कलाकाराला आपण केलेल्या कामाचे चीज झाले ही जाणीव होते.आज मुलीने स्वतःला माँ दुर्गा किंवा माँ काली समजूनच स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करावं. वासनाधारी या राक्षसांपासून हे रूपच तुमचं रक्षण करू शकतो हे या चित्रातून दिसून येत आहे.

 

संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप वाघ, चेअरमन नानासो संजय वाघ, व्हा.चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी,मा.सचिव दादासो महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन दादासो खलील देशमुख तांत्रिक विभाग चेअरमन वासूअण्णा महाजन यांनी चित्राचे कौतुक करून कांतायन सरांना समाजपयोगी संदेश देणाऱ्या नवनवीन कलाकृती निर्माण करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन.आर. ठाकरे सर उपमुख्याध्यापक श्री.आर. एल पाटील सर पर्यवेक्षक श्री.ए. बी. अहिरे, सौ. ए. आर. गोहील,कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, श्री.प्रितम पाटील सर, श्रीमती संगीता वाघ मॅडम, सौ ज्योती ठाकरे मॅडम,श्री प्रमोद पाटील सर यांनी ही शुभेच्छा देऊन कौतुक केले.