मतदारसंघात एमआयडीसी कागदावरच. . .रेती चोरी हाच एकमेव ‘उद्योग’

मतदारसंघात एमआयडीसी कागदावरच. . .रेती चोरी हाच एकमेव ‘उद्योग’

‘नंबर दोन’च्या धंद्यांवरून वैशालीताई सुर्यवंशींनी आमदारांना घेरले

 

भडगाव, दिनांक 5 (प्रतिनिधी ) : पाचोरा व भडगावमधील एमआयडीसी ही कागदावरच असून मतदारसंघात आता रेती चोरी हाच एकमेव ‘उद्योग’ सुरू असल्याची खोचक टिका करत शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

 

आज सकाळच्या सत्रात भडगाव तालुक्यातील सावदे, गोंडगाव, बांबरूड प्र. प्रा. आणि नावरे आदी गावांमध्ये शेतकरी शिवसंवाद यात्रेचे अतिशय उल्हासात स्वागत करण्यात आले. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सर्व गावातील घरोघरी जाऊन लोकांचे आशीर्वाद घेतले. यासोबत त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेत याचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.

 

याप्रसंगी बोलतांना वैशालीताई सुर्यवंशी यांनी विद्यमान आमदारांवर टिकेची जोरदार झोड उठविली. त्या म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात मतदारसंघ अक्षरश: भकास झालेला आहे. गावोगावी अनेक समस्या असल्या तरी याचे निराकरण करण्यात आलेले नाही. संपूर्ण मतदारसंघात अवैध धंद्यांची चलती आहे. यात आमदारांनी जाहीर केलेली पाचोरा आणि भडगाव येथील एमआयडीसी ही कागदावरच असली तरी वाळू चोरी हा एकमेव ‘उद्योग’ सुरू असल्याचा टोला त्यांनी मारला. तर आपण निवडून आल्यानंतर मतदारसंघातील नंतर दोनचे धंदे बंद करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. तर दुसरीकडे सरकारने सर्वसामान्यांना महागाईचे चटके दिल्यावर आता विविध योजनांच्या माध्यमातून आमीष दाखवले जात आहे. मात्र जनता आता अतिशय जेरीस आली असून हा पूर्ण संताप मतदानातून व्यक्त करण्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.

 

गोंडगाव येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला अद्याप देखील शिक्षा सुनावण्यात आले नसल्याकडे देखील वैशालीताई सुर्यवंशी यांनी लक्ष वेधून घेतले. आमदारांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याच्या वल्गना केल्या. यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणे करण्याचे नाटक केले. मात्र या सर्व बाबी फोल ठरल्या असून आपल्या कन्येला अद्यापही न्याय मिळाला नसल्याची खंत वैशालीताईंनी याप्रसंगी व्यक्त केली.

 

आजच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेत सावदे येथील शिवाजी पाटील, शरद पाटील, नाना पाटील, आत्माराम पाटील व प्रदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी समस्या मांडल्या. यात शेतरस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे ग्रामस्थ नाराज असल्याचे दिसून आले. तर रेशनची समस्या सोडवण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली. गोंडगाव येथे विजय साळुंखे, भाऊसाहेब ठाकरे, पुरूषोत्तम पाटील, संजय पाटील, गणेश पाटील, मोहन पाटील, गणेश दिलीप पाटील आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. या गावाला जाण्यासाठी मुख्य रस्ताच नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. तर शेत रस्त्यांची बिकट अवस्था झाल्याची व्यथा ग्रामस्थांनी सांगितली. बांबरूड येथील रतन परदेशी, सुभाष मोरे, प्रताप परदेशी, नेहरू नाना, भीकनदादा, प्रकाशदादा, सरपंच भीमसिंगदादा, नेहरू पाटील, मोहन परदेशी, बाबाजी परदेशी, पीरचंद पाटील, अंबरसिंग परदेशी, विजय परदेशी, इंदल पाटील आदींसह ग्रामस्थांशी वैशालीताईंनी संवाद साधला. येथील पाटावरील पुल जीर्ण झाल्याने याचे नूतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यासोबत गावात एकलव्यांचा पुतळा, सभागृह, समाजमंदिर, जीनमाताकडे जाणारा रस्ता आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या. या सर्वांचे निराकरण करण्याची ग्वाही वैशालीताई सुर्यवंशी यांनी दिली.

 

यात्रेत गणेश परदेशी, बाळू पाटील, दीपक पाटील,मनोहर चौधरी, योजना पाटील, भाऊसाहेब पाटील, पप्पू पाटील, उषा परदेशी, प्रवीण आबा, अण्णा चौधरी, रतन परदेशी, गोरखदादा, सुभाष महाजन, विकास जाधव, जगन जाधव, राजाराम जाधव, शरद जाधव, बद्री जाधव, विजय साळुंखे, दत्तू मांडोळे, माधव जगताप, चेतन पाटील, राजू मोरे, नवल राजपूत, पप्पू पाटील, जे.के. पाटील, सनी, चेतन पाटील, मनीषा पाटील, निता भांडारकर, गायत्री पाटील, सुरेखा वाघ, माधुरी पाटील, मीरा जैसवाल, सिंधूताई वाघ, मिनाक्षी पाटील, अरूणा पाटील आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.