मराठी भाषा अभिजातच – डॉ. अतुल देशमुख

मराठी भाषा अभिजातच – डॉ. अतुल देशमुख

 

 

 

*पाचोरा दि. 06 -* पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने नुकतेच केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला त्याबद्दल ‘मराठी भाषा अभिजातच!’ या विषयावर व्याख्यान व वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन भडगाव येथील सौ. रजनताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी मराठी भाषा अभिजातच असून तिला 2500 वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. शिलालेख, ताम्रपट, अनेक प्राचीन ग्रंथ व त्यावरील संशोधनानुसार मराठीच्या पाऊलखुणा आपणास पहावयास मिळतात. याच्या बळावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यामुळे आता मराठी भाषा अधिक समृद्ध होऊन संशोधन करण्यासाठी मोठा वाव मिळणार आहे असे स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख डॉ. जे. व्ही. पाटील हे होते. त्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे साधर्म्य मांडले. भाषांच्या अनेक शब्दात सरमिसळ असते हे देखील त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख डॉ. वासुदेव वले यांनी मराठी भाषा यापुढे 450 विद्यापीठातून शिकवली जाणार तर केंद्र सरकारकडून त्यासाठी विशेष अनुदान दिले जाणार म्हणून मराठी भाषा आणखी समृद्ध व्हायला मोठी मदत होईल असे प्रतिपादन केले.

यावेळी कार्यक्रमाला IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. राजेश वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. अमित गायकवाड, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. वैशाली कोरडे, प्रा. संजिदा शेख, श्री. बी. जे. पवार, श्री. सुरेंद्र तांबे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले.