प्रकाश तेली यांच्या शिक्षा की महत्ता काव्य संग्रहाचे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी चे कार्याध्यक्ष शीतला प्रसाद दुबे यांच्या हस्ते प्रकाशन

प्रकाश तेली यांच्या शिक्षा की महत्ता काव्य संग्रहाचे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी चे कार्याध्यक्ष शीतला प्रसाद दुबे यांच्या हस्ते प्रकाशन

 

 

 

 

 

जळगांव :- कवी, लेखक, पत्रकार व गीतकार प्रकाश रामदास तेली यांच्या शिक्षा की महत्ता काव्य संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी चे कार्याध्यक्ष शीतला प्रसाद दुबे यांच्या हस्ते मुंबई येथे झाले. शिक्षा की महत्ता काव्य संग्रह हा अभिनव असून समाजाला दिशा देणार आहे ह्या काव्य संग्रहामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येतील आणि प्रत्येकास जीवनात शिक्षण किती महत्वाचे आहे याचे आकलन देखील होईल असे ही त्यांनी सांगीतले. शिक्षा की महत्ता काव्य संग्रह हा शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाची गरज ह्यासोबत अनेक सामाजिक संदेश देण्याचे काम करतो.

 

 

 

काय आहे शिक्षा की महत्ता काव्य संग्रहाची प्रस्तावना:- आयुष्यात काही मिळो किंवा न मिळो, पण शिक्षण हे प्रत्येकाला मिळालेच पाहिजे. शिक्षणाने जे बळ मिळते ते इतर कोणत्याही गोष्टीतून किंवा घटकाकडून मिळत नाही. शिक्षणाशिवाय ना देश बदलतो ना समाज. शिक्षण हे एकमेव असे माध्यम आहे ज्यामध्ये प्रत्येकाला बदलण्याची क्षमता आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, तरीही आपण शिक्षणाबरोबरच अनेक उद्दिष्टे साध्य करू शकलो नाही. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

 

 

 

काय विशेषता आहे शिक्षा की महत्ता काव्य संग्रहाची:-

 

शिक्षा की महत्ता कविता संग्रहात शिक्षणाचे महत्व, शिक्षणाची गरज, शिक्षण न घेतल्याने होणारे दुष्परिणाम ह्यासोबतच अनेक पैलूंबाबत सविस्तर माहिती ह्या कविता संग्रहात दिलेली आहे. व्यक्तीमत्व आणि देशाच्या जडणघडणीत शिक्षणाची भूमिका किती मोलाची भूमिका असतेय याची माहीती ह्या कविता संग्रहातून होते. दैनंदिन जीवनात जश्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात तितकेच महत्वाचे शिक्षण देखील महत्वाचे आहे. कारण ह्यामुळे वैयक्तीक आणि राष्ट्रीय उत्पादकता देखील वाढते.

 

शिक्षण हे जीवनात तितकेच गरजेचे आहे जितके आपल्या मुलभुत गरजा कारण शिक्षणाशिवाय ना देश क्रांती करू शकतो ना कोणती व्यक्ती. या कविता संग्रहात विविध शीर्षक असलेल्या 50 कविता असून ह्या सर्व कविता शिक्षणाचे महत्त्व आधोरेखित करतात.

 

कोण आहेत प्रकाश तेली आणि काय आहे त्यांची साहित्य संपदा:- प्रकाश रामदास तेली हे जागतिक विक्रम केलेले साहित्यिक असून त्यांचे विविध सामाजिक विषयांवर आतापर्यंत 13 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत त्यांनी कविता व घोषवाक्य लेखनाचा विश्वविक्रम केलेला असून त्यांच्या कार्याची विविध रेकॉर्ड बुक्स मध्ये नोंद झालेली आहे.

 

प्रकाश तेली कवी, लेखक, गीतकार, व पत्रकार असून त्यांनी 5000 पेक्षा जास्त सामाजिक व इतर कविता ह्या लिहिलेल्या असून 7000 पेक्षा जास्त घोषवाक्य/स्लोगन देखील लिहिलेले आहेत. लवकरच त्यांच्या पेड़ की महत्ता (झाड़ा चे महत्त्व) कविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे.