के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अग्री बीझनेस मॅनेजमेंट विभागातर्फे कार्यक्रम

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अग्री बीझनेस मॅनेजमेंट विभागातर्फे कार्यक्रम

 

 

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अग्री बीझनेस मॅनेजमेंट विभागातर्फे कार्यक्रम – के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अग्री बीझनेस मॅनेजमेंट विभागातर्फे अभिनव कृषी व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्य जोपासणे या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,प्रमुख मान्यवर श्री अनिल भोकरे व श्री शैलेंद्र चव्हाण ,कार्यक्रमाचे समनव्यक व विभाग प्रमुख डॉ वीणा भोसले ,अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले .या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्रातील पुढच्या पिढीला विकसित होत असलेल्या कृषी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक ज्ञान ,नेतृत्व कौशल्य ,आणि धोरणात्मक अंतर्दृष्टी देऊन आकार देणे तसेच पारंपरिक कृषी पद्धतींसह नाविन्यपूर्ण दृष्टिकोन एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करणे ,विद्याथ्यांना आधुनिक कृषी प्रणालीच्या जटिलतेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास सक्षम करणे ,कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या विविध आयामांचा शोध घेणे कि ज्यात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण ,आर्थिक नियोजन ,पुरवठा साखळी व्यवस्थापन ,आणि जागतिक बाजारातील ट्रेंड यांचा यात समावेश होतो नाविन्यपूर्ण कृषी व्यवस्थापन उभारण्यासाठी नेतृत्व कौशल्य जोपासणे ,कृषी क्षेत्रात सकारत्मक बदल आणि नावीन्य पण आणू शकतील अश्या सर्वगुण संपन्न ,अग्रेषित विचारसरणीचे नेते तयार करणे हे उद्दिष्ट आहेत . त्याकरिता संसाधन व्यक्ती श्री अनिल भोकरे यांनी शाश्वतता आणि पर्यावरणीय समतोल या विषयावर विचार मांडले सोबत शेतीतील डिजिटल परिवर्तन स्मार्ट शेतीच्या युगातील नेतृत्व या विषयावर श्री शैलेंद्र चव्हाण यांनी विचार मांडले . १५ संप्टेंबर २०२४ ला आयोजित क्रिएटिव्ह कॅप्चर इव्हेंट कार्यक्रमात प्रथम विजेते निलेश सोनवणे ,द्वितीय क्रमांक वैष्णवी राजपूत ,तृतीय क्रमांक मो इस्माईल या विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष कोटेचा व अमृता करोडपती यांनी केले .कार्यक्रमाला ऍग्री बीझनेस मॅनेजमेंट विभागातील सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.