हुतात्मा दीपक शिंपी यांना वैशालीताई सुर्यवंशी यांचे अभिवादन

हुतात्मा दीपक शिंपी यांना वैशालीताई सुर्यवंशी यांचे अभिवादन

 

पाचोरा, दिनांक 4 (प्रतिनिधी ) : देशाचे संरक्षण करतांना हुतात्मा झालेले वीर जवान दीपक शिंपी यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी त्यांना अभिवादन केले.

 

वीरगतीस प्राप्त झालेले हुतात्मा दीपक पांडुरंग शिंपी यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच गाळण बुद्रुक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना वंदन केले. याप्रसंगी शासकीय अधिकारी, कर्मचारी, लष्कराचे जवान, पोलीस कर्मचारी आदींसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अतिशय शोकाकुल वातावरणात वीर जवान दीपक शिंपी यांना अखेरचा निरोप देण्यात आला.