शेतकरी व व्यापारी हे समाजाचे अविभाज्य घटक : वैशालीताई सुर्यवंशी

शेतकरी व व्यापारी हे समाजाचे अविभाज्य घटक : वैशालीताई सुर्यवंशी

पाचोऱ्यात महाराज अग्रसेन जयंतीनिमित्त शोभायात्रेसह कार्यक्रम

 

पाचोरा, दिनांक ४ (प्रतिनिधी ) : माझ्या वडिलांपासून आमचे अग्रवाल समाजबांधवांशी संबंध असून शेतकऱ्यांसह व्यापारी हे समाजाचे अविभाज्य घटक असल्याचे प्रतिपादन वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या महाराजा अग्रसेन जयंती निमित्त आयोजीत विशेष कार्यक्रमात बोलत होत्ो.

 

महाराजा अग्रसेन जयंतीचे औचित्य साधून अग्रवाल समाजबांधवांच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात दुपारी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन अग्रसेनजी यांना वंदन केले. याप्रसंगी त्यांच्या वतीने समाजबांधवांना आईसक्रीमचे वाटप करण्यात आले. यानंतर सायंकाळी महालपुरे मंगल कार्यालयात आयोजीत समाजबांधवांच्या विशेष कार्यक्रमाला वैशालीताई यांनी उपस्थिती दिली. त्यांच्या हस्ते विविध गुणदर्शन कार्यक्रमातील विजेत्यांना गौरविण्यात आले.

 

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून अग्रवाल समाजाच्या कर्तबगारीचा सन्मानपूर्वक उल्लेख करतांनाच तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्यापासून असलेल्या ऋणानुबंधाबाबत भाष्य केले. तसेच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत समाजबांधवांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.

 

याप्रसंगी भरत खंडेलवाल, अनिल सावंत, संदीप जैन, राजेंद्र राणाजी, अभिषेक खंडेलवाल, तिलोत्तमा मौर्य, सावंत, खंडू सोनवणे, पप्पू जाधव, बंटी हटकर, दादाभाऊ चौधरी, अरमान तडवी, प्रशांत पाटील व निखील भुसारे यांच्यासह अग्रवाल समाजातील बंधू-भगिनींची उपस्थिती होती.