पाचोरा येथे मोफत बाल हृदयरोग तपासणी शिबिर उत्साहात 

पाचोरा येथे मोफत बाल हृदयरोग तपासणी शिबिर उत्साहात

 

पाचोरा…

येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव व एस.एम.बी. टी. हॉस्पिटल, घोटी, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने “मोफत बाल हृदयरोग तपासणी शिबिर” उत्साहात संपन्न झाले. पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आज दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 शुक्रवार रोजी सकाळी 11 ते सायंकाळी दुपारी 4 वाजे दरम्यान संपन्न झालेल्या बालकांच्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिरात दाखल 250 बालकांची मोफत हृदयरोग तपासणी करण्यात आली.

 

याप्रसंगी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट चेअरमन बालरोग तज्ञ डॉ. राहुल काटकर, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरुड, डॉ. भूषण मगर, रोटरी सदस्य डॉ. मुकेश तेली, चंद्रकांत काका लोढाया, निलेश भाई कोटेचा, प्रदीप बापू पाटील, डॉ. बाळकृष्ण पाटील, गोरखदादा महाजन, रावसाहेब पाटील, अरुणा उडवांत उपस्थित होते.

 

एस.एम.बी.टी. हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ञ डॉ. दक्षा धोंडगे यांनी बालकांची हृदयरोग तपासणी केली. याप्रसंगी डॉ. युनूस शहा, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ. शितल वाघ व डॉ.अभिषेक जगताप, डॉ. वैशाली जाधव, एस.एम.बी.टी. हॉस्पिटलचे जिल्हा समन्वयक नितीन कोळी, तसेच डॉ. जितेश पाटील, नाना सोनवणे आदी डॉक्टर्स व हॉस्पिटल मधील वैद्यकीय उपचार सहकारी उपस्थित होते.