मनपा अंतरशालेय खो-खो स्पर्धेत आर आर शाळेचे वर्चस्व

मनपा अंतरशालेय खो-खो स्पर्धेत आर आर शाळेचे वर्चस्व

 

जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित म.न.पा.स्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धा 2024 दि 19 21व 22 सप्टेंबर 2024 या दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे संपन्न झाल्या. स्पर्धेसाठी शहरातील विविध शाळांमधील 14,17,19 वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या 73 संघांतील 968 खेळाडूंचा समावेश होता. स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री गणपतराव पोळ क्रीडा अधिकारी श्री विशाल घोडके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सहसचिव श्री जयांशु पोळ राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री मीनल थोरात जळगांव जिल्हा खो खो असोसिएशनचे खजिनदार सौ विद्या कलंत्री जळगाव जिल्हा खो खो असोसिएशन सचिव श्री राहुल पोळ श्री विशाल पाटील श्री दिलीप चौधरी निरंजन ढाके हे उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक , म.न.पा क्रीडा अधिकारी दिनानाथ भांबरे व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री गणपतराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून श्री जयांशु पोळ श्री दिलीप सूर्यवंशी सौ विद्या कलंत्री श्री राहुल पोळ श्री दत्तात्रय महाजन श्री विशाल पाटील श्री दिलीप चौधरी कु. प्रतीक्षा सपकाळ कु.अंजली सावंत श्री गोपाळ पवार श्री हर्षल बेडीसकर श्री निरंजन डाके श्री केतन चौधरी श्री छगन मुखडे श्री मोहित गुंजकर प्रथमेश कंखरे यांनी काम पाहिले तसेच स्पर्धा परीक्षेसाठी जळगाव जिल्हा खो खो असोसिएशन व श्री गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी सर्व खेळाडूंनी परिश्रम घेतले

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

14 वर्षाआतील मुली

प्रथम – आर.आर.विद्यालय, जळगाव

द्वितीय – अनुभूती इंग्लिश स्कूल, जळगाव

तृतीय – विवेकानंद इंग्लिश स्कूल, जळगाव. 14 वर्षाआतील मुले

प्रथम – विवेकानंद इंग्लिश स्कूल, जळगाव

द्वितीय – आर.आर.विद्यालय, जळगाव

तृतीय – अनुभूती इंग्लिश स्कूल, जळगाव

17 वर्षाआतील मुली

प्रथम – आर.आर.विद्यालय, जळगाव

द्वितीय – श्रीराम माध्यमिक विद्यालय,मेहरूण, जळगाव

तृतीय – प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव

17 वर्षाआतील मुले

प्रथम – अनुभूती इंग्लिश स्कूल, जळगाव

द्वितीय – आर.आर.विद्यालय , जळगाव

तृतीय – श्रीराम माध्यमिक विद्यालय मेहरूण जळगाव

19 वर्षाआतील मुली

प्रथम – स्वामी विवेकानंद काॅलेज, जळगाव

द्वितीय – डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालय, जळगाव

तृतीय – सिद्धिविनायक माध्य व उच्चमाध्यमिक विद्यालय, जळगाव

19 वर्षाआतील मुले

प्रथम – सिद्धिविनायक माध्य व उच्चमाध्यमिक विद्यालय, जळगाव

द्वितीय – स्वामी विवेकानंद काॅलेज, जळगाव

तृतीय – नुतन मराठा काॅलेज, जळगाव