महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव विभागीय पातळीवर संघटनात्मक आढावा बैठक संपन्न 

महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव विभागीय पातळीवर संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

 

दि.०२/१०/२०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता यशवंतराव मुक्तांगण सभागृह जळगाव येथे संघटनेचे परिमंडळ सचिव जळगाव तथा राज्य संयुक्त सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ.जितेंद्र अस्वार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कॉ.भावडू नाईक सर्कल प्रमुख खडका पारेषण सर्कल,कॉ.शरद बारी संचालक भुसावळ पतसंस्था,कॉ.भास्कर सपकाळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य आयटक जळगाव,शरद पवार संचालक चाळीसगाव पतसंस्था प्रमुख उपस्थिती मध्ये पुढील विषयावर चर्चा व विचार विनिमय करून संपन्न झाली आहे

१.) सभासदांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी समस्या

२.) सभासद नोंदणी, विद्युत कर्मचारी, वीज कामगार मुखपत्र सभासद नोंदणी बाबतीत

३.) संघटनात्मक बांधणी बाबत चर्चा

४.) अध्यक्ष यांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळी च्या विषयावर चर्चा करणे

सभासद पदाधिकारी यांच्या चर्चेत उपस्थित झालेल्या प्रश्नांमध्ये मागील तक्रार निवारण समिती चे प्रलंबित प्रश्न पुन्हा उपस्थित करून सोडविण्यासाठी प्रयत्न करणे,पीडी व्हेरिफिकेशन यादी करतांना येणाऱ्या अडचणी व सक्तीचे विरोधात आवाज उठवणे, गावठाण जागेवर घरकुल झाले आहेत नवीन उतारा शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी मुळे जबाबदार धरून जनमित्रांसोबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येईल असे पत्रव्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना करणे, देखभाल दुरुस्ती साठी सुरक्षा साधने हत्यारे त्वरित उपलब्ध करून देणे, ठेकेदारांवर अंकुश ठेवणे, निकृष्ट दर्जाचे कामांचे बाबतीत चौकशी चा आग्रह धरणे, कोणतेही पूर्ण झालेले

काम संबंधित जनमित्रांची सही झाली शिवाय वर्क कम्पलिट रिपोर्ट देऊ नये,एजी बिल वाटप करून फोटो टाकण्यात यावे अशी सक्ती करु नये सदर काम ठेकेदारांवर सोपविण्यात आले असेल तर खुलासा करावा, विभाग अंतर्गत बदली झाली आहे अशा कर्मचारी यांचे पेट्रोल भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करण्यात यावे.ग्रामीण व शहरी भागातील डिस्ट्रिब्युशन बॉक्स ची अवस्था अत्यंत खराब झाल्याने त्वरित बदलून मिळाव्यात,सोलर लोड एक्स्टेंशन साठी संबंधित कक्ष अभियंता यांच्या परवानगीने मंजूर करण्यात यावे कारण ऑटो झाल्यामुळे कनैक्शन देणं भाग पडते डीटीसी वर लोड वाढतो उन्हाळ्यात त्याचं दूष्परिणाम जळगाव विभाग मध्ये विशेष करून शहरात फोर्सड लोडशेडींगचं अवलंब करावा लागला आणि जनमित्रांना जीवघेणा हल्ला,शीवीगाळ, मारहाण सहन करावा लागला.उपकेंद्रे व जनमित्रांना संरक्षणासाठी उपाययोजना करणे, ग्रामीण भागातील कक्ष कार्यालयात शिडी डिस्चार्ज रॉड,, सुरक्षा साधने हत्यारे त्वरित उपलब्ध करून देणे, सर्वत्र अधिकारी अभियंता टिडिपीडी, वसुली देखभाल दुरुस्ती या बाबतीत दबाव तंत्राचा वापर करतात, मानसिक संतुलन खराब होत आहे,बंच केबल बसविण्यात येत आहेत त्या पोलवर चढण्यासाठी चैनल व एंगल बसविण्यात यावेत

मेन्टेनन्स साठी साहित्य त्वरित* उपलब्ध झाले पाहिजे.संपूर्ण गणपती उत्सवात एल्युमिनिअम फेज टाकून कामकाज केले परंतु नवरात्र उत्सव मध्ये वीजभार वाढण्याची शक्यता गृहीत धरून तांब्याच्या फेज तार त्वरित मिळावे.एक व दोन वर्ष झाली तरी ईन्क्रीमेंट लागू झालं नाही. ईन्क्रीमेंट च्या तारीख मध्ये झालेल्या बदलामुळे होणारे नुकसान, सामान्य आदेश क्रमांक ७४ चे आदेश निर्गमित करण्यात यावे या आणि अशा अनेक अडचणी मांडल्या आणि येत्या काळात सदर प्रश्नांवर चर्चा करून मार्ग न निघाला तर सर्वसंमतीने आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला*.*कॉ प्रभाकर महाजन विभागीय प्रमुख यांनी बैठकीत प्रस्तावना व सूत्रसंचालन केले.विचार व्यक्त करताना सांगितले की आम्ही जळगाव मध्ये जूने सभासद असूनही काही जणांना संधी दिली परंतु त्याचे सकारात्मक परिणाम झाले नाही याचे शल्य आहे.

कॉ. किशोर जगताप विभागीय सचिव यांनी मनोगत व्यक्त करताना विभागीय पातळीवर संघटनात्मक पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे.पदांवर असून जबाबदारी निभावली पाहिजे हे फेडरेशन चे तत्व अंगिकारून मी कामकाज करण्यासाठी कटीबद्ध असून आपल्या सर्वांना सहकार्य करावे हि विनंती आणि अपेक्षा आहे.

कॉ.शरद पवार यांनी संघटनेचे कामकाजात सर्वांनी मिळून हिरीरीने भाग घेतला तर कोणत्याही प्रकारची प्रश्नाचे बाबतीत आपण निर्णय घेण्यास प्रशासन ला भाग पाडू शकतो असे मत मांडले

सदर बैठकीस संबोधित करताना* *कॉ.भास्कर सपकाळे यांनी सांगितले की वर्कर्स फेडरेशन ही एक गल्ली ते दिल्ली पर्यंत सर्वांच्या साठी, सहभागी होऊन काम करणारी संघटना असून आपण नेतृत्वावर विश्वास ठेवून आपलं कामकाज सुरू ठेवावे मी सेवा निवृत्त असलो तरी कोणत्याही वेळी संघटनेचे कामासाठी उपलब्ध राहील असे आश्वासन दिले

कॉ.भावडु नाईक सर्कल प्रमुख खडका पारेषण सर्कल यांनी मनोगत व्यक्त करताना वर्कर्स फेडरेशन ही बलाढ्य आणि मूळ संघटना असून आपण सर्व सभासद पदाधिकारी यांनी शिस्त पाळणे अत्यावश्यक आहे.आपल्या केंद्रीय नेतृत्वाने अत्यंत मोठे योगदान देऊन चांगली पगारवाढ मिळवून दिली आहे त्याची जाणीव ठेवून आपण आपल्या जबाबदारीने संघटनेला नेमून दिलेला वाटा देणे गरजेचे आहे असे सांगितले

कॉ.जितेंद्र अस्वार केंद्रीय कार्यकारिणी सदस्य यांनी संघटनेचे कामकाजात पारदर्शकता* *आणण्यासाठी आपल्या ला स्वयंशिस्त पालन आणि संघटनेने आपल्या ला काय दिले आहे याची जाणीव ठेवून एकसंघ राहण्यासाठी आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कॉ.विरेंद्रसिंग पाटील यांनी यांनी संघटनेचे सभासद म्हणून आपण नोंदणी केली आहे ही आपल्या साठी अत्यंत अभिमानाची बाब आहे याची जाणीव आपण सर्वांनी ठेवाव लागेल.कोणत्याही प्रकारचे संप न करता करता ७ मार्च २०२४ रोजी १५ टक्के वर अडकून फिस्कटलेली पगारवाढ आपल्या केंद्रीय नेतृत्वाने ७ जूलै रोजी आपल्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा व निष्णात बुध्दीमतेच्या जोरावर सक्षमपणे मांडणी करून १९ टक्के पगारवाढ मिळवून दिली आहे.सहा प्रमुख संघटनेचे घटक म्हणून एक मोठ्या भावाची भूमिका निभावत असताना स्मार्ट मीटर चे दुष्परिणाम*, *खाजगीकरण, फ्रैंचाईझी, जूने पेंशन योजना, कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार यांना* *कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणे अशा प्रश्नांवर २५/२६ सप्टेंबर चा संप सुध्दा न करता यशस्वी वाटाघाटी करून प्रशासनला सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी बाध्य केले आहे.

आपण कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभन ला बळी न पडता संघटनेचे कामासाठी सहभागी होऊन जबाबदारी पार पाडावी

सदर बैठकीस कॉ.गिरीष बर्हाटे, विभागीय प्रसिद्धी प्रमुख,कॉ.किशोर सपकाळे विभागीय संघटक, कॉ.समाधान पाटील संचालक धनदाई पतसंस्था धरणगाव,कॉ. किरण सपकाळे,कॉ.किरण भोई विभागीय उपाध्यक्ष,कॉ.गोकुळ बाविस्कर, कॉ.नासीर शेख,कॉ.रामसुख शामसुंदर शुक्ला,कॉ गणेश सोनार, कॉ.सचिन फड,कॉ.विकास तायडे, कॉ.नितेंद्र गिरासे,कॉ.भगवान बारी यांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला.कॉ.भावडू नाईक सर्कल प्रमुख खडका पारेषण यांच्या व कॉ भास्कर सपकाळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य आयटक निवड झाली त्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.खेळीमेळीच्या वातावरण मध्ये बैठक संपन्न झाली

 

कॉ.किशोर जगताप विभागीय सचिव महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन जळगाव विभाग