के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात महात्मा गांधीजी जयंती साजरी

के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात महात्मा गांधीजी जयंती साजरी

 

 

के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात महात्मा गांधीजी जयंती साजरी….के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात् महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करण्यात आली .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस मालयार्पण करून जयंती साजरी करण्यात आली .2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असते. बापूंनी नेहमीच लोकांना सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. बापूंचे हे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला नेहमीच मार्गदर्शन करत आले आहेत आणि यापुढेही करत राहतील. या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील साजरा केला जातो. १५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला. दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्मदिवस म्हणून देशात आणि जगभरात हा दिवस साजरा केला जातो. ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना ‘महात्मा गांधी’ म्हणून संबोधले जाते. लोक प्रेमाने त्यांना ‘बापू’ असेही म्हणतात. तसेच गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ मानले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अहिंसा, सविनय कायदेभंग व सत्य हे तत्त्व सामर्थ्यवान साधने म्हणून वापरणाऱ्या गांधीजींना आदरांजली देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.कार्यक्रमाला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार, प्रा.हर्षा देशमुख,प्रा.डॉ विणा भोसले,प्रा.गणेश पाटील, प्रा.के बी पाटील,प्रा.दर्शन ठाकूर,प्रा.राहुल पटेल,प्रा.प्रसाद कुलकर्णी , महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन प्रा.विजय चौधरी यांनी केले.