चोपडा महाविद्यालयात एन.सी.सी.कॅडेटसाठी ‘अमृत योजना’ विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात एन.सी.सी.कॅडेटसाठी ‘अमृत योजना’ विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयात केंद्र शासनाच्या ‘अमृत योजना’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. डी.डी. कर्दपावर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अमृत योजने संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ४९ महाराष्ट्र एन.सी.सी बटालियन अमळनेरचे सुभेदार जान मोहम्मद, उपप्राचार्य प्रा. डॉ. के एन सोनवणे,उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए. वाघ, मार्गदर्शक व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार तसेच व प्रताप विद्यामंदिर शाळेचे एन.सी.सी अधिकारी रोहन पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी एनसीसी कॅडेट दीपक कोळी याची सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.डी. ए. सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एनसीसी विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना समाजापर्यंत पोहोचविण्याकरता एनसीसी कॅडेट्स यांनी पुढाकार घ्यावा व ग्रामीण व शहरी भागातील स्वच्छता मोहीम एनसीसी कॅडेट्स ने हाती घ्यावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन प्रा.डॉ. बी. एम. सपकाळ यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील व प्रताप विद्यामंदिर शाळेतील एन.सी.सी कॅडेट्स उपस्थित होते.