TAS चे विद्यार्थी बनले उद्योजक – शाळेत ‘बाजार दिन’ कार्यक्रमाचे आयोजन 

TAS चे विद्यार्थी बनले उद्योजक – शाळेत ‘बाजार दिन’ कार्यक्रमाचे आयोजन

 

 

द अकादमी स्कूल (TAS), पुणे यांनी विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी उद्योजक बनण्यासाठी आणि वास्तविक जगात पैसा कसा कार्य करतो हे जाणून घेण्यासाठी ‘बाजार दिन’ आयोजित केला होता. बनावट चलनासह व्यापाराचा हा उपक्रम TAS कॅम्पसमध्ये आयोजित केला गेला. यामध्ये नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी, ग्रेड 1 आणि ग्रेड 2 चे विद्यार्थी खरेदीदार आणि विक्रेते बनले होते. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे हा होता.

 

विद्यार्थ्यांनी आपली दुकाने थाटून, वस्तूंच्या किमती निश्चित करून बनावट नोटांच्या मदतीने खरेदी-विक्रीत सहभागी झाले. या संपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांनी बजावली आणि पार पाडली. यावेळी विद्यार्थांना आर्थिक प्रक्रिया व आर्थिक विवेकबुद्धीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आला.

 

डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमात गणित विषय शिकताना केवळ आकडेमोड न शिकवता नकली चलनाच्या मदतीने आर्थिक ज्ञान देण्यात आले. मैथिली तांबे म्हणाल्या की, हा संपूर्ण या संपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांची सखोल माहिती देण्यात आली. ज्यामध्ये विद्यार्थी स्वतः दुकानदार आणि ग्राहक बनले होते.त्याचबरोबर शाळेचा परिसराला एका बाजारपेठेचे स्वरूप आले होते. या उपक्रमात पालकांचा सहभाग नसल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे बळ मिळाले.

 

उपक्रमच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. व्यवहार खर्चाची गणना करणे यामुळे एकाच वेळी शिक्षण आणि जबाबदार व्यक्तीचा अनुभव विद्यार्थांना अनुभवता आला. विद्यार्थांना वास्तविक जगाच्या अनुभवांसाठी आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

 

आपले विचार मांडताना, द अकॅडमी स्कूलच्या फाऊंडेशनल इयर्स कोऑर्डिनेटर सुनैना मुथा म्हणाल्या, “या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पूर्णपणे मग्न होणे आणि स्वतः निर्णय घेणे हे आमचे उद्दिष्ट होते. हा उपक्रम आर्थिक साक्षरतेचा पाया घालण्याबद्दल महत्त्वपूर्ण आहे.

 

दिवसाच्या शेवटी अनेक विद्यार्थ्यांनी अभिमानाने आपली कमाई प्रदर्शित केली आणि त्यांच्या दुकानांच्या यशाने ते भारावून गेले. एका शिक्षकाने सांगितले की, काही विद्यार्थी चर्चा करत आहेत की, ते पुढील बाजार दिनात कोणत्या गोष्टीची विक्री करू शकता आणि कोणत्या गोष्टीची खरेदी करू शकतात.