विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी शिंदाड येथे सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेला अत्यावश्यक पुस्तकांचे संच भेट म्हणून देण्यात आले

विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी शिंदाड येथे सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेला अत्यावश्यक पुस्तकांचे संच भेट म्हणून देण्यात आले.

 

शिंदाड गावातील शाळेत तरूणांनी अभ्यासिका सुरू केली असून यात गावातील विद्याथ हे युपीएससी, एमपीएससी, बँक, रेल्वे आदींपासून ते पोलीस भरतीसाठी अभ्यास करत असतात. या तरूणांना अखोल अध्ययनासाठी ताजे संदर्भ असणाऱ्या पुस्तकांची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन या अभ्यासिकेला सर्व परिक्षांना उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकाचा संच भेट म्हणून दिला. याप्रसंगी त्यांनी अभ्यास करणाऱ्या तरूणाईशी संवाद साधत त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमाला उध्दव मराठे, अभय पाटील, अरूण पाटील, शरद पाटील, अरूण तांबे, आनंदा चौधरी, किरण पाटील, समाधान पाटील, रवींद्र पाटील, विजयानंद पाटील, आण्णा भोई, सदाशिव पाटील, बापु पाटील, लक्ष्मण पाटील, राजु पाटील, संजय पाटील, आजीम बेग, संभाजी पाटील, शितल पाटील, कांचन परदेशी, सुरेखा मंगेश पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.