शासनाने धनगर एसटी प्रमाणपत्राची अंमलबजावणी न केल्याने नेवासाफाटा येथे उपोषणाला बसलेल्या दोन तरूणांची गोदावरीच्या नदी पात्रात उड्या टाकून जलसमाधी ?

शासनाने धनगर एसटी प्रमाणपत्राची अंमलबजावणी न केल्याने नेवासाफाटा येथे उपोषणाला बसलेल्या दोन तरूणांची गोदावरीच्या नदी पात्रात उड्या टाकून जलसमाधी ?

 

(सुनिल नजन/”चिफब्युरो” अहमदनगर) महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र देण्यासाठीची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ नेवासाफाटा येथे नउ दिवसापासून उपोषणाला बसलेल्या दोन उपोशनार्थींनी प्रवरासंगम येथील नदीच्या पुलावरून उड्या टाकून गोदावरीच्या नदीपात्रात जलसमाधी घेतल्याचा संशय सर्वत्र वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजात सरकाच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासाफाटा येथे गेल्या आठरा सप्टेंबर पासून सकल धनगर समाजाचे प्रल्हाद सोरमारे, संभाजीनगर (औरंगाबाद), बाळासाहेब कोळसे (पाथर्डी),राजूमामा तागड (मीरी,पाथर्डी),रामराव कोल्हे (जालना),देविलाल मंडलिक(जामखेड), भगवान भोजने(अंबड), हे सहाजण उपोशनाला बसले होते. नवू दिवस झाले तरीही सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने उपोशनार्थींनी हे टोकाचे पाउल उचलले आहे. पंढरपूर, लातूर, नेवासाफाटा,संभाजी नगर आणि इतर ठिकाणी ही धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र आंदोलनाचा वनवा पेटलेला आहे. नेवासाफाटा येथे सुरू असलेल्या आंदोलनास कोणत्याही आमदार खासदार यांनी भेट ही दिली नाही म्हणून उपोशनार्थींनी संताप व्यक्त केला. उपोशनार्थींची प्रक्रुती ढासळत चाललेली होती.धनगर समाजात त्याचा तीव्र असंतोष निर्माण झाला होता. त्याच्या निषेधार्थ संभाजीनगर -अहमदनगर रस्त्यावर टायर पेटवून देऊन चक्काजाम आंदोलन ही करण्यात आले होते. चक्का जाम आंदोलना नंतर नेवासा पोलिसांनी आंदोलकावर 37,31प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. धनगर समाजाला सरकार एसटी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार जाणून बूजून टाळाटाळ करून त्रास देत असल्याची भावना उपोशनार्थींमध्ये निर्माण झाली होती. म्हणून प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे यांनी गुरुवारी सकाळी टाँयलेटला जातो असे सांगत 7007 या गाडीत बसून थेट प्रवरा संगमच्या नदीवर जाउन गाडी पुलाशेजारी लावून त्या गाडीत एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये आम्ही सोरमारे आणि कोळसे जलसमाधी घेत आहोत याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार आहे. अशा आशयाचा मजकूर लिहलेला होता.आणि पुलावर बाळासाहेब कोळसे यांच्या कोल्हापूरी चपला आढळून आल्याने या दोघांनी जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शेजारच्या राहुरी, शेवगाव, वैजापूर,पाथर्डी, गंगापूर या तालुक्यातील धनगर कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवरा संगम पुलावर जमा होउन त्यांनी तेथेच रास्ता रोको आंदोलन केले आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत रस्ते जाम केले. या आंदोलना मुळे या राज्य मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आणि वाहतूक व्यवस्था पुर्ण कोलमडली होती.धनगर आरक्षणाचा वनवा आता संपूर्ण महाराष्ट्र भर पसरलेला आहे.सरकार नेमकी काय भुमीका घेते याकडे सर्व धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.या दरम्यान आता तिसरे उपोशनार्थी रामराव कोल्हे यांनीही सरकारला जलसमाधी घेण्याचा ईशारा दिला आहे. या सर्व उपोशनार्थींनी अगोदरच सरकारला लेखी निवेदन देऊन जलसमाधीचा इशारा देऊन ही सरकारने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने हा वनवा पेटला आहे. गोदावरीच्या पात्रात उड्या टाकल्याच्या संशयावरून सर्वत्र शोधमोहीम राबवली असताना कोठेही सोरमारे व कोळसे यांचा थांगपत्ता लागला नाही.