पाचोरा येथे किशोर आप्पा बहुउद्देशीय संस्थेकडून भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

पाचोरा येथे किशोर आप्पा बहुउद्देशीय संस्थेकडून भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

 

 

किशोर आप्पा बहुउद्देशीय संस्था पाचोरा यांच्यावतीने पाचोरा येथील स्वामी लॉन्स येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व यूपीएससी ,एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी 100 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पाचोरा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोर पाटील यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. एमपीएससी आणि यूपीएससी व्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी करिअर केले पाहिजे .केंद्रीय पातळीवरील इतर स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे आहे. केंद्रीय पातळीवरील इतर परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे .स्पर्धा परीक्षा म्हणजेच करिअर नव्हे ,आज प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उंचावण्याची संधी युवकांना आहे .याप्रसंगी राज्य शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठीच्या योजनांचा आढावा देखील आमदार किशोर पाटील यांनी घेतला.

परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा ओळख ,तयारी व आव्हाने या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले व पुणे येथील युनिक अकॅडमी चे तज्ञ मार्गदर्शक कपिल हांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .

 

 

स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक असतो असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले यांनी केले. राजेंद्र चिंचोले यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी जिद्द ,चिकाटी, परिश्रमपूर्ण अभ्यास करण्याचे आवाहन केले .स्पर्धा परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी झालेल्या यशस्वी व्यक्तींची उदाहरणे दिली.केवळ कागदावरचे गुण म्हणजे बुद्धिमत्ता हा समज काढून टाकावा.गुणांच्या आधारे विद्वत्तेचे मोजमाप न करता स्वतःची ओळख आणि आपली बलस्थाने यांचा विचार करून आपल्यातील कुवत याचा देखील विचार विद्यार्थ्यांनी करावा अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या.

 

कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक कपिल हांडे यांनी यूपीएससी व एमपीएससी याद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे स्वरूप सविस्तरपणे समजून सांगितले. आपली बुद्धिमत्ता ओळखून व्यावसायिक, कौशल्यपूर्ण, बुद्धिमत्तेचा वापर करून प्रत्येकाने जीवनात यशस्वी व्हावे अशा प्रकारचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, युवा नेते सुमित पाटील, शिवसेनेचे किशोर बारावकर ,माजी उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, प्रवीण ब्राह्मणे ,,जितेंद्र जैन ,चंद्रकांत धनवडे, प्रमोद सोनार ,हेमंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक भदाने, पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा ,कर निरीक्षक कासार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित पाटील यांनी केले. याप्रसंगी पांडुरंग पवार, मुस्तफा मिर्झा ,राहुल खैरनार यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण कुणाल पाटील, कुंदन पवार, अंकित पाटील तसेच एमपीएससी परीक्षेत यशस्वी विद्या पाटील, विशाल पाटील, अतुल पाटील, गरिमा पाटील, किशोर चौधरी ,यामिनी पाटील ,युगंधरा पाटील आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी 90 विद्यार्थी अशा एकूण 100विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन प्रवीण ब्राह्मणे यांनी केले. याप्रसंगी 500 पेक्षा जास्त विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, विकास गिरासे ,नरेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.