गाव व शिवारातील रस्ते गेले खड्डयात, आम्ही वापरायचे तरी कसे ? संतप्त ग्रामस्थांचे वैशालीताई सुर्यवंशी यांना साकडे

गाव व शिवारातील रस्ते गेले खड्डयात, आम्ही वापरायचे तरी कसे ? संतप्त ग्रामस्थांचे वैशालीताई सुर्यवंशी यांना साकडे

 

*पाचोरा, दिनांक २५ (प्रतिनिधी )* : ”आमच्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले असून यासोबत शेत शिवारातील रस्ते देखील भयंकर अवस्थेत आहेत. यामुळे आम्ही वापरायचे तरी कसे ?” असा संतप्त सवाल करत आज ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याशी शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान वार्तालाप करतांना व्यथा मांडल्या.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, भोजे , चिंचपुरे, पिंप्री बुद्रुक प्र. पा.; डांभुर्णी, कोल्हे आदी गावांमधून यात्रा काढण्यात आली. यातील प्रत्येक गावांमध्ये वैशालीताईंचे भव्य स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या सोबतच्या वार्तालापात आबालवृध्दांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचे साकडे ताईंना घातले.

दरम्यान, शेतकरी शिवसंवाद यात्रेत भोजे येथील दीपक पाटील, विकास पाटील, सचिन उबाळे, शैलेश पाटील, सतीश दिवाळे आदींसह इतरांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. या सर्वांचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वागत केले.

आज बहुतांश ठिकाणचे शेतकरी आणि ग्रामस्थांनी गावातील तसेच शिवारातील रस्त्यांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. यामुळे अनंत अडचणी येत असल्याने या समस्येचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. यावर वैशालीताई सुर्यवंशी यांनी तात्काळ निराकरण करण्याची ग्वाही दिली. यात सावखेडा ते आंबेवडगाव रस्त्याच्या दुर्दशेबाबत शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. भोजे येथे नदीला संरक्षण भिंत तसेच गावात पाण्याचा फिल्टर प्लांट उभारण्याची मागणी करण्यात आली. तर चिंचपुरे गावात रस्ते तर नाहीतच पण भीषण पाणीटंचाई असल्याची व्यथा मांडण्यात आली. तसेच शौचालयांची समस्या देखील भेडसावत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. पिंप्री प्र.पा. येथे शाळेच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून शेत रस्ते नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कोल्हे येथील शासकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्याने रूग्णांची गैरसोय होत असून रेशकार्ड, शौचालय आदींच्याही समस्या असल्याची व्यथा मांडण्यात आली. या संदर्भात आपण जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्याकडे पाठपुरावा करून समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी केली.

शेतकरी शिवसंवाद यात्रेत आज सावखेडा बुद्रुक येथील सुनील परदेशी, सुभाष परदेशी, संजय सोनवणे, सुभाष पाटील, संभाजी खरे, संतोष परदेशी, अनिल पाटील, दगडू तडवी, राजेंद्र सोनवणे; सावखेडा खुर्द येथील सरपंच सविता पाटील, अण्णाभाऊ परदेशी, चिंधाबाई पाटील यांच्यासह ग्रामस्थ; भोजे येथील खुशालनाना, सतीश उभाडे, प्रशांत माळी, संतोष पाटील, सतीश माळी, सतीश क्षिरसागर, संतोष यादव पाटील, सचिन पेंटर, मोतीलाल उबाळे, माधव माळी, अशोक जाधव, प्रशांतभाऊ; चिंचपुरे येथील भागवत पाटील, समाधान पाटील, धनराज पाटील, भास्कर पवार, श्रीराम कुमावत, गजानन पाटील, राहूल पाटील, डिगंबर पाटील, गजानन पाटील, अमर पाटील, गनी चांदखा तडवी; पिंप्री प्र.पा. येथील सतीश मराठे, संजयभाऊ, मनोज बेलदार, पवन पाटील, विक्रम राजपूत, नितीन नाईक, प्रतीक राजपूत; डांभुर्णी येथील गोविंद परदेशी, भरत परदेशी, कैलास पाटील, जगदीश परदेशी, गोकुळ जमादार, उत्तम परदेशी, मंगल परदेशी, रामदास गोरडे आदींसह परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.

आजच्या यात्रेत अरूण पाटील, अरूण तांबे, रवींद्र पाटील, आनंदा चौधरी, शशी बोरसे, ज्ञानेश्वर चौधरी, दीपक परदेशी, सुनील पाटील, प्रितेश जैन, कोमल आबा, राहूल बडगुजर, राहूल चौधरी, निंबादास माळी, आनंदा चौधरी, समाधान हटकर, भागवत पाटील, अनिकेत जैन, सुनील पाटील, राजेंद्र पाटील, भास्कर पाटील, प्रकाश चव्हाण, अशोक पाटील, योजना पाटील, कुंदन पांड्या, अनिल पाटील, लक्ष्मी पाटील, मनीषा पाटील, बेबाताई पाटील आदी मान्यवरांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.