गावाच्या विकासात ग्रामसेवकाची महत्वाची भूमिका : नरेंद्रसिंग सुर्यवंशी

गावाच्या विकासात ग्रामसेवकाची महत्वाची भूमिका ! : नरेंद्रसिंग सुर्यवंशी

पाचोऱ्यात आदर्श ग्रामसेवक पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सत्कार

 

*पाचोरा, दिनांक 24 (प्रतिनिधी )* : ग्रामविकासात ग्रामसेवकाची महत्वाची भूमिका असून यासाठी आदर्श असलेल्या ग्रामसेवकांना सन्मानीत करून त्यांच्या कामाचा यथोचित गौरव केला असल्याचे प्रतिपादन नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांनी केले. ते आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त मतदारसंघातील ग्रामसेवकांच्या सत्कारात बोलत होते.

 

जळगाव येथे नुकतेच राज्य शासनाच्या वतीने सन 2017/18 ते 2022/23 या वर्षांमधील आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात भरीव कामगिरी करणाऱ्या जिल्हाभरातील ग्रामसेवकांना शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने गौरविण्यात आले. यात पाचोरा मतदारसंघातील सातगाव डोंगरी व खडकदेवळ्याचे विकास मच्छींद्र आप्पा; वडगाव कडे येथील सतीश सतरे; भातखंडे येथील नितीन बोरसे; वरखेडी-शिंदाडचे गजानन नन्नवरे; खेडगाव नंदीचे व कुरंगी येथील आबा पाटील, राजूरी व शेवाळेचे संजय चौधरी, परधाडे येथील इच्छा शिंदे; नांद्रा येथील अनिता सपकाळे यांचा समावेश होता. या सर्वांचा आज शिवसेना-उबाठा पक्षाच्या संपर्क कार्यालयात नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांनी हृद्य सत्कार केला. या कार्यक्रमाला ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार बोराळे, तालुकाध्यक्ष नंदकिशोर पाटील व माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांची उपस्थिती होती.

 

याप्रसंगी आपल्या मनोगतातून नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांनी ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीचा योग्य विनीयोग करून विकासकामांना चालना देण्याची मोठी जबाबदारी ही ग्रामसेवकांवर असून या माध्यमातून गावांमध्ये विकास होऊ शकतो. नेमकी हीच जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या कर्तव्यदक्ष ग्रामसेवकांच्या कार्याचे कौतुक आज आपण करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी करत या सर्व मान्यवरांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

 

या कार्यक्रमाला अरूण पाटील, गजू पाटील, हरीभाऊ पाटील, भरत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, प्रशांत पाटील, संजय परदेशी, खंडूभाऊ सोनवणे, कुंदन पांड्या आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी यांच्यासह अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.