चोपडा महाविद्यालयात ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळेचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळेचे आयोजन

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.के.एस.भावसार (परीक्षा विभाग प्रमुख) व एस.बी.पाटील (मानसशास्त्र विभाग) उपस्थित होते. तसेच प्रा.सौ.एस.टी.शिंदे, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी डॉ.डी.डी.कर्दपवार आदी व्यापीठावर उपस्थित होते.

या कार्यशाळेप्रसंगी प्रास्ताविक करताना, डॉ.डी.डी.कर्दपवार यांनी विद्यार्थ्यांना ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळेची माहिती दिली.

या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात मार्गदर्शक डॉ.के.एस.भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, विद्यार्थ्यांनी कॉपी न करता कॉपी मुक्त परीक्षा दिली पाहिजे जेणेकरून त्यांचा नुकसान होणार नाही. तसेच विद्यापीठ कॉपी केस संदर्भात पीपीटीच्या माध्यमातून सांगताना कॉपीचे प्रकार, त्यासंदर्भातील विद्यापीठ नियमांची माहिती विस्तृतपणे दिली. कॉपी मुक्त परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक एस.बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘ताण-तणाव मुक्त परीक्षा’ या विषयावर मार्गदर्शन करताना, ताण-तणाव म्हणजे काय?, ताण-तणावाचे नियोजन कसे करता येईल? यासंदर्भात पीपीटीच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कालावधीत ताण न घेता योग्य पोषण आहार घेतले पाहिजे, अभ्यासाचे नियोजन करून त्यानुसार अभ्यास केल्यास ताण कमी होईल यासंबंधी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. जयश्री शिंदे हिने केले. तर आभार कु. गंगा करनकाळे हिने मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाविद्यालयातील  विद्यार्थी उपस्थित होते.