पाचोरा तहसिल कार्यालयातील अति महत्वाचे रेकॉर्ड रुम राम भरोसे हरिभाऊ पाटील 

पाचोरा तहसिल कार्यालयातील अति महत्वाचे रेकॉर्ड रुम राम भरोसे हरिभाऊ पाटील

या गंभीर विषयाकडे म.उपविभागिय अधिकारी सो.पाचोरा तसेच

म.तहसिलदार सो.पाचोरा यांनी वेळीच लक्ष देवुन

रेकॉर्ड विभागाची आणि त्यात असलेल्या अति महत्वाच्या रेकॉर्ड ची काळजी घेण्यात यावी

त्या विभागात एक ही जबाबदार शासकिय अधिकारी नसल्यामुळे

त्या विभागात सर्वत्र खाजगी नको त्या व्यक्तींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो प्रत्येक खाजगी व्यक्ती त्यांच्या सोई नुसार रेकॉर्ड तपासणी करतो वेळ प्रसंगी त्याला आवश्यक असलेल्या नोंदी चे रेकॉर्ड मध्ये तो हवे असलेले लिखाण देखील करुन घेतो आणि ते रेकॉर्ड दुसऱ्या च ठिकाणी ठेवुन देतो रेकॉर्ड विभागात कोणतेही रेकॉर्ड गाव नुसार लावण्यात आलेले नाही प्रत्येक खाजगी व्यक्ती त्यांच्या सोई नुसार रेकॉर्ड ची पाहणी करतो आणि त्याचे काम झालेवर दुसऱ्या च गाव च्या रेकॉर्ड मध्ये ठेवुन देतो त्यामुळे बरेच रेकॉर्ड वेळेवर मिळुन येत नाही

वरिल जबाबदार अधिकारी सो.यांना विनंती करण्यात येते की आपल्या तहसिल कार्यालयातील रेकॉर्ड विभागाची काळजी घेवुन त्या अति महत्वाच्या रेकॉर्ड रुम मधुन खाजगी व्यक्तीला तात्काळ बाहेर करावे कोणत्याही खाजगी व्यक्तीला त्या रेकॉर्ड रुम मध्ये कोणत्याही सबबीवर प्रवेश देवु नये खाजगी कामगार देखील त्या विभागात राहणार नाही याची देखील दक्षता घेण्यात यावी खाजगी कर्मचाऱ्याकडुन बरीच चुकीची कामे आर्थिक व्यवहार करुन केली जात आहे त्यासाठी तात्काळ अति महत्वाच्या रेकॉर्ड चे रक्षण करावे कोणताही खाजगी कर्मचारी त्या विभागात फिरकणार नाही याची काळजी घेवुन शासकीय कर्मचारी यांची रेकॉर्ड रुम चे रक्षणा करिता कायम नियुक्ती करावी

रेकॉर्ड रुम मधला सावळा गोंधळाचा गैर प्रकार तातडीने थांबविण्यासाठी कारवाई करावी

आपला

श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील

संस्थापक अध्यक्ष

बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, पाचोरा