पाचोऱ्यात रंगली ‘एक शाम बाबा रामदेवजी के नाम’ भजन संध्या सुशील बजाज यांच्या भजनांनी भाविक मंत्रमुग्ध
*पाचोरा, दिनांक २३ (प्रतिनिधी )* : बाबा रामदेवजी यांच्या जागरणाच्या अंतर्गत येथे सादर करण्यात आलेल्या ‘एक शाम बाबा रामदेवजी के नाम’ ! या विशाल भजन संध्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. यात सुशील बजाज यांच्या मराठी, हिंदी, बंजारा, गुजराथी व मारवाडी भजनांना उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिराच्या बाजूच्या मैदानावर सुशील गोपालजी बजाज आणि सहकाऱ्यांच्या ‘एक शाम बाबा रामदेवजी के राम !’ या विशाल भजन संध्येचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी विठ्ठल माझा माझा आणि अन्य अभंग सादर करण्यात आले. यानंतर, खम्मा. . .खम्मा तसेच एकापेक्षा एक सरस गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. तर अनेक गाण्यांवर उपस्थित बंधू-भगिनींनी ठेका धरल्याचे दिसून आले. यातच सुशील बजाज यांच्या उपस्थितीत नरेंद्रसिंगदादा व वैशालीताई यांनी ठेका धरल्यावर उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले. यानंतर हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला.
कार्यक्रमात यानंतर बालरूपी रामदेवजी बाबांचे सुर्यवंशी दाम्पत्याच्या हस्ते पूजन करण्यात आले. तर शेवटी आरती करण्यात आली. या विशाल भजन संध्येला रूपनगर, पळासखेडा, मोहाडी, नालबंदी, बदरखे तांडा, आंबेवडगाव तांडा, आंबेडवडगाव तांडा-२, कोकडी तांडा, जोगी तांडा, निंभोरी तांडा, सातगाव डोंगरी तांडा, वरसाडे तांडा, गाळण, गाळण तांडा, हनुमानवाडी आदी गावांसह परिसरातील आबालवृध्द भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान, या कार्यक्रमाला उध्दव मराठे, रमेश बाफना, अरूण पाटील, अभय पाटील, पप्पू राजपूत, दीपक पाटील, मनोहर चौधरी, जे. के. पाटील, शरद पाटील, अनिल सावंत, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, संदीप जैन, मनोज चौधरी, बंटी हटकर, हरीभाऊ पाटील, विकास वाघ, अरूण तांबे, राकेश सोनवणे, शंकर मारवाडी, ज्ञानेश्वर चौधरी, संजय चौधरी, बाळू पाटील, गणेश पाटील, अरूण तांबे, प्रितेश जैन, योजना पाटील, तिलोत्तमा मौर्य, अनिता पाटील, कुंदन पांड्या, जयश्री येवले, बेबाताई पाटील, मनीषा पाटील, सुरेखा वाघ, गायत्री बिरारे, सोनाली पाटील, उज्वला पाटील, पुष्पाताई परदेशी, सुलोचना पाटील, सोनाली चौधरी, चेतन पाटील, लक्ष्मी पाटील आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी आदींसह अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.