धनगर समाज एसटी प्रमाणपत्र अंमलबजावणी राज्य व्यापी आंदोलनास जनशक्ती विकास आघाडीचा जाहीर पाठिंबा ः काकडे

धनगर समाज एसटी प्रमाणपत्र अंमलबजावणी राज्य व्यापी आंदोलनास जनशक्ती विकास आघाडीचा जाहीर पाठिंबा ः काकडे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”/अहमदनगर जिल्हा) सरकारने एसटी प्रमाणपत्र अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज रस्त्यावर उतरून उपोशन,आणि रास्ता रोको आंदोलन करीत आहे. त्या धनगर समाजाच्या रास्त आंदोलनास अहमदनगर जिल्ह्यातील 222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील जनशक्ती विकास आघाडी तर्फे जाहीर पाठिंबा देत असल्याचा संदेश जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अँडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी दिला. ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासाफाटा येथे धनगर समाजाचे नेते १) संभाजीनगर येथील प्रल्हाद सोरमारे,२)बाळासाहेब कोळसे पाथर्डी,३)राजूमामा तागड, मीरी पाथर्डी,४)रामराव कोल्हे जालना,५)देविलाल मंडलिक जामखेड,६)भगवान भोजने, अंबड हे सहाजण उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपुस काकडे साहेब यांनी केली.आणि त्यांच्या उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या समवेत जनशक्ती विकास आघाडीचे महासचिव जगन्नाथ गावडे हे आवर्जून उपस्थित होते.काकडे पुढे म्हणाले की सत्ता धाऱ्यांनी आतापर्यंत धनगर समाजाचा फक्त वापरच करून घेतला आहे. परंतु समाजाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही.त्यांना जो न्याय मिळायला पाहिजे होता तो आतापर्यंत मिळाला नाही.वास्तविक पाहता या समाजाला एसटी कँटेगीरीचे प्रमाणपत्र आजपर्यंत मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही. शासनाने एसटी प्रमाणपत्र देण्यासाठी त्वरित अंंमलबजावणी करावी या मागणीसाठी मी जाहीर पाठिंबा देत आहे. या पुर्वी ही अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करावे म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्या नामांतरालाही जनशक्ती विकास आघाडीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र शासन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करून न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहील. यावेळी नेवासाफाटा येथे उपोषणाला बसलेले राजूमामा तागड आणि त्यांचे सर्व सहकारी आणि धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.