शिवसेना-उबाठात ‘इनकमिंग’ : सहा गावातील कार्यकर्त्यांचा प्रवेश 

शिवसेना-उबाठात ‘इनकमिंग’ : सहा गावातील कार्यकर्त्यांचा प्रवेश

 

पाचोरा, दिनांक २१ (प्रतिनिधी ) : वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सहा गावांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.

 

सध्या शेतकरी शिवसंवाद यात्रा सुरू असून यात मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश होत आहे. कालच यात्रेत शेकडो तरूण व महिलांनी प्रवेश घेतला होता. यानंतर शुक्रवारी रात्री भडगाव तालुक्यातील कनाशीसह परिसरातील कनाशी, चिंचपूरे, सार्वे, नालबंदी तांडा, पांढरद आणि बोदर्डे या सहा गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्षात दाखल झाले.

 

आज प्रवेश घेणाऱ्यांमध्ये तरुणाईचा लक्षवेधी समावेश होता. सर्वांचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वागत करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तयार राहण्याचे आवाहन केले.

 

या प्रवेश सोहळ्याला उध्दव मराठे, अरूण पाटील, शरद पाटील, अभय पाटील, गणेश परदेशी, दीपक पाटील, जे.के. पाटील, योजना पाटील, डी. डी. पाटील, बाळू पाटील, राजू पाटील, मच्छींद्र पाटील, मनोहर चौधरी, भैय्या पाटील, शंकर पाटील, चंद्रशेखर चव्हाण, नंदू पाटील, शरद पाटील, प्रदीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संतोष पाटील, निखील भुसारे, शशी बोरसे, भैय्या सुर्यवंशी आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.