के सी ई इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उदघाटन
के सी ई इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण :महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणालीद्वारे मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले .वर्धा येथून मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने या सर्व केंद्राचे उदघाटन केले . त्यावेळी मा राज्यपाल तथा कुलपती .सी पी राधाकृष्णन , मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार . मा कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा हे सर्व ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमास उपस्थित होते . के सी ई इंजिनिअरींग व मॅनेजमेंट महाविद्यालयात असलेल्या सेमिनार सभागृहात या कार्यक्रमाच्या उद्धघाटनाचे प्रक्षेपण करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी कौशल्य केंद्र विषयी माहिती दिली तसेच जागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकून राहण्यासाठी शिक्षणासोबत कौशल्य विकास महत्वाचा आहेत असे सांगून उपलब्ध केंद्राचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आव्हान केले . या वेळी निरीक्षक म्हणून मनोज पंडित महाजन विशेष कार्य अधिकारी कौशल्य विभाग मंत्रालय ,चंद्रकांत दुसाने कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र जळगाव तर प्रमुख मान्यवर मा. यास्मिन ताहेर तडवी सहाय्यक अभियंता महावितरण गणेश कॉलनी जळगाव ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार ,प्रा. किरण बी पाटील विभाग प्रमुख प्रथम वर्ष अभियांत्रिकी ,प्रा .अविनाश सूर्यवंशी विभाग प्रमुख संगणक विभाग ,प्रा कल्पेश महाजन ,इलेक्ट्रिकल विभाग प्रा .राहुल पटेल विभाग प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभाग ,प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.