एम एम महाविद्यालयातील मैदानावर शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेंना सुरुवात

एम एम महाविद्यालयातील मैदानावर शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेंना सुरुवात

 

 

दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी 17 वर्षा आतील मुले व मुली शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात सुरू झाल्या सदर स्पर्धा या एस एस एम एम कॉलेज पाचोरा यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे

याबाबत अधिक असे की जिल्हा क्षेत्रात सुरू असलेल्या शासकीय शालेय स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि त्यातीलच व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान हा एस एस एम एम कॉलेज पाचोरा यांना मिळाला दिनांक 19 सप्टेंबर रोजी या स्पर्धेचे उद्घाटन व्हा चेअरमन नानासो व्ही टी जोशी संचालक डॉ जयवंत पाटील , क्रीडा अधिकारी डॉ सुरेष थरकूडे , कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा जी बी पाटील पर्यवेक्षक प्रा एस एस पाटील क्रीडा समनव्यक व क्रीडा शिक्षक प्रा गिरीष पाटील , डि एन पाटील सर धरणगाव , गिरीष पाटील सर जामनेर व इतर मान्यवरांच्या हस्ते व्हॉलीबॉल मैदानाचे पूजन करून स्पर्धेची सुरुवात केली सदर स्पर्धेत जवळजवळ 15 मुलांचे व 15 मुलींचे संघ सहभाग नोंदवीला सदर स्पर्धेत जिल्हा भरातील शाळांनी उत्कृष्ट प्रतिसाद नोंदविला सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंच म्हणून निलेश कुलकर्णी , प्रफुल्ल पाटील , स्वप्नील बागुल सर , करण पाटील , सनी राठोड सर , हर्षल मिस्तरी , साक्षी पाटील , पूनम बागुल , प्रथमेश पाटील , जयेश पाटील व व्हॉलीबॉल खेळाडू यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली. व स्पर्धा सर्व पार पाडल्या. डॉ प्रा अतुल सूर्यवंशी यांनी सुत्रसंचलन केले व प्रा गिरीष पाटील यांनी आभार मानले.