पाचोरा शहरातील स्वामी लाॅन्स येथे सौ. सुवर्णा जितेंद्र पाटील यांच्या तर्फे आयोजित गालिचा रांगोळी शिबिराचे उदघाटन करण्यात आले

पाचोरा शहरातील स्वामी लाॅन्स येथे सौ. सुवर्णा जितेंद्र पाटील यांच्या तर्फे आयोजित गालिचा रांगोळी शिबिराचे उदघाटन करण्यात आले

 

(पाचोरा तालुका प्रतिनिधी अनिल आबा येवले )————————————- शहरातील मान्यवर महिलांच्या उपस्थितीत स्वामी लॉन्स येथे पार पडले,शिबिराचे अध्यक्ष सौ. उज्ज्वला अशोक महाजन मॅडम होत्या प्रमुख पाहुणे म्हणून सौ. पूजाताई अमोल शिंदे,सौ. ललिता पाटील, सौ. छाया वाणी, सौ. तारा बाळू पाटील, सौ. सरोज गोसावी मॅडम, सौ.अरुणा उदावंत मॅडम, सौ. अश्विनी सोमपूरकर मॅडम, सौ. वृषाली सचिन दुसाने मॅडम, सौ. मीनाताई वाघ, सौ. भारती सतीश भावसार या उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दर्शना जिग्नेश वसंत यांनी केले त्यांनी रांगोळीचे सांस्कृतिक महत्व,शास्त्रीय महत्व, त्याचा आपल्या आरोग्याशी असणारा जवळचा संबंध याविषयीं अतिशय सविस्तर माहिती दिली.,कार्यक्रमाचे उदघाट्न हे कलेची देवता श्री नटराज मूर्तिचे पूजन करुन व रांगोळी चे बिंदू काढून करण्यात आले.ईशस्तवन म्हणून श्रीरामाचे गीत सौ.सुवर्णा पाटील मॅडम यांनी सर्वांकडून म्हणून घेतले., प्रास्ताविक सौ. सुवर्णा पाटील यांनी केले, त्यात त्यांनी महिलांनी कोणत्याही नवनवीन गोष्टी शिकण्यास सदैव तयार असावे, तसेच एका कलेतून अनेक कलांचा जन्म होत असतो म्हणून माणसाने एक जरी कला शिकली की आपोआप मनुष्य कलेकडे वळतो असे सांगितले, कला शिकण्यासाठी वयाची कुठलीही अट नसते, माणसाने सदैव विद्यार्थी म्हणून जगावे, असे सांगितले. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. उज्ज्वला महाजन (देशमुख )मॅडम यांनी शिबिराबद्दल, रांगोळी विषयी, मॅडम यांच्या रांगोळी कलेविषयी, पाचोरा शहरात रांगोळी शिबीर पहिल्यांदा आयोजित करण्याऱ्या, व रांगोळी कलेला एक वेगळी ओळख देणाऱ्या व त्यातूनच स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सौ. सुवर्णा पाटील या आहेत असे सांगितले.शेवटी सौ. सीमा पाटील मॅडम यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व रांगोळी ग्रुपच्या सदस्य महिलांनी परिश्रम घेतले. यानंतर सर्व शिबिरार्थीना रांगोळी शिकवण्यास सुरुवात झाली.शिबीर हे तेरा दिवस चालणार आहे, त्यात 27,28 व 29 रोजी पुणे येथील कलाकार हे तीन दिवस 5,5 तास शिकवणार आहेत, (असे एकूण 35 तासांचे म्हणजेच 1 महिन्याचे असे 13 दिवसात होईल) त्यात ते त्यांच्या कला शिबिरार्थीना शिकवतील, रांगोळीतील नवीन गोष्टी, टूल्स चा वापर, ऍडव्हान्स रांगोळी प्रकार शिकवतील, म्हणून अजूनही कोणाला रांगोळी शिकायची असेल तर स्वामी लॉन्स येथे 3ते 5 या वेळेत भेट द्यावी किंवा 9403180923 ला कॉल करावा..अशा प्रकारे कार्यक्रम अतिशय नियोजन बद्ध पार पडला, अतिशय छान प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार श्री अनिल आबा येवले, व श्री राजेंद्र खैरनार यांनी उपस्थिती दिली.रांगोळी ग्रुप सदस्य पूजा राजेंद्र देसाई, वैशाली योगेश पाटील, मोहिनी ज्ञानेश्वर बोरसे, दीपाली विजय सोनार, पिंकी राजकुमार जिनोदिया, मीनाताई राजेंद्र वाघ, प्राजक्ता सतीश येवले, अपूर्वा विजय येवले, प्रतिभा प्रकाश बडगुजर,सीमा दुष्यन्त पाटील, ज्योती शुभम पाटील, कल्याणी रवींद्र राजपूत, सुवर्णा रमेश पाटील, वंदना सिद्धार्थ सोनवणे, शीतल मनोज पाटील अर्चना चंद्रकांत पाटील, रुपाली अशोक बोरसे, स्मिता किशोर बारावकर , सुनंदा सुनील वाघ, वैष्णवी भगवान कुमावत, यांनी खूप सहकार्य केले.