जनतेला दिलेली आश्वासने कागदावरच राहिली पाचोरा तालुक्यातील भयाण वास्तव; ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

जनतेला दिलेली आश्वासने कागदावरच राहिली पाचोरा तालुक्यातील भयाण वास्तव; ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

 

पाचोरा, दिनांक १९ (प्रतिनिधी ) : ”आम्हाला साधा रस्ता देखील चांगला करून मिळत नाही. आधी आम्हाला नेते आश्वासन देऊन गेलेत मात्र ते कागदावरच राहिले !” अशी व्यथा व्यक्त करत तालुक्यातील ग्रामस्थांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. शेतकरी शिवसंवाद यात्रेत ते वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासोबत वार्तालाप करत होते.

 

पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वैशालीताई सुर्यवंशी यांनी काढलेल्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. गुरूवारी सकाळच्या सत्रात पाचोरा तालुक्यातील परधाडे, वडगाव टेक, मोहाडी आणि पहाण या गावांमध्ये यात्रा पोहचल्यानंतर याचे भव्य स्वागत करण्यात आले.

 

यात परधाडे येथे स्व. आर. ओ. तात्यासाहेब पाटील यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या आज देखील अतिशय सुस्थितीत असलेल्या सभागृहात वैशालीताई सुर्यवंशी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यात ज्येष्ठ ग्रामस्थांनी परधाडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याकडे ताईंचे लक्ष वेधले. आजवर नेत्यांनी आश्वासन देऊन देखील काम पूर्ण न झाल्यामुळे गावातल्या ज्येष्ठांनी संताप व्यक्त केला. यावर आपण निवडून आल्यास रस्त्याचे काम मार्गी लावण्याची ग्वाही वैशालीताईंनी दिली.

 

यानंतर पहाण येथे ग्रामस्थांशी वार्तालाप करतांना दूध संघासह बाजार समितीत सत्ताधारी हेच सत्तेत असतांना देखील शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याची टिका वैशालीताई सुर्यवंशी यांनी केली. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतांना कपाशीला चांगला भाव मिळत होता, तर आज शेतकरी योग्य भाव नसल्याने नैराश्यात असल्याचे वैशालीताई म्हणाल्या.

 

याप्रसंगी परधाडे येथील सुनील पाटील, बाबूलाल वडर, लक्ष्मण महाजन, शुभम पाटील, नामदेव पाटील, अभय कोळी, चेतन पाटील, रामदास महाजन, विश्वनाथ पाटील, वसंत पाटील, रमेश तडवी, सागर पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रतिक महाजन; वडगाव टेक येथील स्वप्नील कुमावत, गणेश कुमावत, उमेश पाटील, मनोज राजपूत, अश्वीन राजपूत, शुभम खैरे, विनोद पाटील, अमरसिंग पाटील; वडगाव शेरीचे दिलीप पाटील, मच्छींद्र पाटील, बाळू पाटील, रोहित पाटील; मोहाडीचे नरसिंग नाईक, प्रवीण पाटील, अनिल पवार, अमोल पाटील व आधार पाटील तर पहाणचे अप्पा महाजन, आनंदा पाटील, सागर पाटील, दादाभाऊ पाटील, गोपाळ पाटील व पीरण पाटील आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

 

आजच्या यात्रेत उध्दव मराठे, अभय पाटील, डॉ. अस्मिता पाटील, शरद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अनिल सावंत, मनोज चौधरी, राजूभैय्या पाटील, राजेंद्र पाटील, लोकेश पाटील, अमोल महाजन, किरण पाटील नितीन महाजन, धनराज पाटील, रवींद्र पाटील, तिलोत्तमा मौर्य, लक्ष्मी पाटील, संदीप जैन, दादाभाऊ पाटील, अप्पा महाजन, समीर पाटील, आनंदा पाटील, लालसिंग जाधव, संपत माळी, संतोष पाटील आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.